शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता पोलिसांचा पलटवार; सीबीआयच्या हंगामी संचालकांच्या पत्नीच्या कंपनीवर छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 19:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील जलपाईगुडी येथील आजच्या सभेमध्ये ममता बॅनर्जींवर आरोप करताना माटीला बदनाम केले तर मानुषला मजबूर केल्याचा आरोप केला होता.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सीबीआय विरोधात पोलिस यांच्यामधील तणाव काही निवळायचे नाव घेत नाहीय. कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार चौकशीसाठी शिलाँगला दाखल झालेले असताना पोलिसांनी सीबीआयच्या दोन महत्वाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे मारले आहेत. कोलकाता येथील माजी सीबीआय संचालकांच्या घरावर आणि सीबीआयचे अंतरिम संचालक एम नागेश्वर राव यांच्या पत्नीच्या कंपनीवर हे छापे मारण्यात आले आहेत. नागेश्वर राव यांच्या पत्नीची अँजेलिना मर्कंटाईल प्रा. लि. नावाची सॉल्ट लेक येथे कंपनी आहे. कोलकाता पोलिसांच्या य़ा छाप्यामुळे उद्या होणाऱ्या राजीव कुमार यांच्या चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील जलपाईगुडी येथील आजच्या सभेमध्ये ममता बॅनर्जींवर आरोप करताना माटीला बदनाम केले तर मानुषला मजबूर केल्याचा आरोप केला होता. तसेच पश्चिम बंगालची नवी ओळख दंगेखोर आणि लोकशाही विरोधी बनविल्याचाही आरोप केला होता. मुख्यमंत्री जरी दीदी असल्या तरी दादागिरी भलत्यांचीच सुरु आहे. दलालांनी तृणमूलचे सरकार हाती घेतल्याचा आरोप केला होता. 

 

यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेमध्ये मोदींवर टीका केली. निवडणुका आल्या की मोदी चायवाले बनतात आणि संपल्याकी राफेलवाले बनतात, अशी खोचक टीका त्यांनी केली. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिस