सिडकोच्या व्यवहारास कॅगची पोचपावती

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30

नवी मंुबई: भ्रष्टाचारांच्या विविध आरोपांमुळे सदैव चर्चेत राहिलेल्या सिडको महामंडळाला कॅगने पारदर्शी आर्थिक व्यवहाराची पोचपावती दिली आहे. मागील ४५ वर्षांच्या कारकिर्दीत सिडकोच्या आर्थिक लेखा परीक्षणाच्या अहवालात प्रथमच निरंक असा शेरा मारला गेला आहे. त्यामुळे सिडकोचे मनोबल उंचावले आहे. कॅग अर्थात कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजेच केंद्रीय प्रधान महालेखाकार यांच्यातर्फे सर्व शासकीय आस्थापनांच्या लेखापरीक्षण अहवालांचे पुन:परीक्षण केले जाते.

CAG's acknowledgment of the CIDCO transaction | सिडकोच्या व्यवहारास कॅगची पोचपावती

सिडकोच्या व्यवहारास कॅगची पोचपावती

ी मंुबई: भ्रष्टाचारांच्या विविध आरोपांमुळे सदैव चर्चेत राहिलेल्या सिडको महामंडळाला कॅगने पारदर्शी आर्थिक व्यवहाराची पोचपावती दिली आहे. मागील ४५ वर्षांच्या कारकिर्दीत सिडकोच्या आर्थिक लेखा परीक्षणाच्या अहवालात प्रथमच निरंक असा शेरा मारला गेला आहे. त्यामुळे सिडकोचे मनोबल उंचावले आहे. कॅग अर्थात कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजेच केंद्रीय प्रधान महालेखाकार यांच्यातर्फे सर्व शासकीय आस्थापनांच्या लेखापरीक्षण अहवालांचे पुन:परीक्षण केले जाते.
सिडको व्यवस्थापनाने सादर केलेल्या २०१२-१३ वर्षाच्या आर्थिक ताळेबंदाचा कॅगचा अहवाल सिडकोला प्राप्त झाला आहे. या अहवालात सिडकोच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारावर आक्षेप नोंदविण्यात आला नाही. यावरून सिडकोचा आर्थिक कारभार पारदर्शक व लोकाभिमुख झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांमुळे मलीन झालेली सिडकोची प्रतिमा जपण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आणि सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे सिडकोतील कथित भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. त्याचप्रमाणे विविध विभागांचा कारभार पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून कोणताही आक्षेप नसलेला अर्थात निरंक अहवाल कॅगने सादर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: CAG's acknowledgment of the CIDCO transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.