'कॅग'मुळे खुलासा : रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैनिकांना भेडसावतोय कपड्यांचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 12:27 IST2020-02-04T12:25:09+5:302020-02-04T12:27:16+5:30
सैन्यअधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, कॅगने सादर केलेले अहवाल 2015-16 आणि 208-19 मधील आहे. आता या अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. सियाचीन येथे तैनात एका सैनिकाच्या कपड्यांवर सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.

'कॅग'मुळे खुलासा : रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैनिकांना भेडसावतोय कपड्यांचा तुटवडा
नवी दिल्ली - चीनच्या सीमारेषेवर असलेल्या सियाचीन येथे रक्त गोठवणाऱ्या थंडीत तैनात असलेल्या भारतीय सैनिकांना पुरशा कपड्यांची आणि अन्नाची कमतरता भासत आहे. द टाईम्स ऑफ इंडियानुसार भारताचे महालेखापाल अर्थात 'कॅग'ने दावा केला की, भारतीय सैनिकांकडे थंडीपासून वाचण्यासाठी पुरेशा कपड्यांसह इतर बाबींची कमतरता आहे.
कॅगने दिलेल्या अहवालानुसार सैनिकांना अन्न देखील विपूल प्रमाणात मिळत नाही. त्यावर सुरक्षा मंत्रालयाने सैनिकांना असलेल्या अडचणी लगेच सोडविण्यात येईल, अंस म्हटले आहे. देशाचे रक्षण करत असलेल्या सैनिकांनाच मुलभूत सुविधा मिळाल्या नाही, तर ते देशाचं कस रक्षण करू शकतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान एका सैन्यअधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, कॅगने सादर केलेले अहवाल 2015-16 आणि 208-19 मधील आहे. आता या अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. सियाचीन येथे तैनात एका सैनिकाच्या कपड्यांवर सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.