शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:19 IST

Cabinet Meeting : राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे उभारले जाणार.

Cabinet Meeting : देशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आज (9 ऑक्टोबर 2024) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत धान्य वितरणाची मुदत 4 वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीत इतर अनेक योजनांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली.

मोफत तांदळचा पुरवठाकेंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव म्हणाले की, मंत्रिमंडळाने जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश विकासाला चालना देणे आणि पोषण सुरक्षा वाढवणे हा आहे. गरिबांना मोफत तांदळाचा पुरवठा केल्यास अशक्तपणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दूर होईल.

पोषणमान वाढवण्यावर भरसर्वसामान्यांचे आरोग्य लक्षात घेऊन मोदी सरकारने पोषण सुरक्षा आणि ॲनिमिया मुक्त भारत मोहिमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ॲनिमिया (रक्ताची कमतरता) दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोदी मंत्रिमंडळाने मोठा पुढाकार घेतला आहे. या मोहिमेवर 17,082 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. अशक्तपणा दूर करण्यासाठी पुरवठा साखळीचे जाळे मजबूत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले की, देशातील गरजूंपर्यंत तांदूळ पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी विकसित केली जाईल. 21 हजार तांदूळ कारखान्यांनी 223 एलएमटी फोर्टिफाइड राईसची मासिक क्षमता असलेले ब्लेंडर बसवले आहेत. फोर्टिफाइड तांदळाची गुणवत्ता तपासण्यासाठी 52 लॅब तयार करण्यात आल्या आहेत. पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

सीमावर्ती भागात रस्त्यांचे जाळेयाशिवाय, राजस्थान आणि पंजाबच्या सीमावर्ती भागातील रस्त्यांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या भागात 2,280 किमीचे रस्ते बांधले जातील, ज्यासाठी 4,406 कोटी रुपये खर्च केला जाईल. याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) विकसित करण्यास मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे. समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करणे आणि जगातील सर्वात मोठे सागरी वारसा संकुल तयार करणे हा यामागचा उद्देश असल्याचे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा