मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:41+5:302015-08-02T23:31:41+5:30

(ही बातमी काल पाठविली होती. ज्यांनी वापरली नाही, त्यांच्यासाठी पुन्हा पाठवित आहोत.)

Cabinet meeting held in Dandi | मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

(ह
ी बातमी काल पाठविली होती. ज्यांनी वापरली नाही, त्यांच्यासाठी पुन्हा पाठवित आहोत.)
------------------------
- पंकजा मुंडेंची आघाडी
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आतापर्यंतच्या सर्व बैठकींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर उपस्थित राहिले. या बैठकींना दांडी मारण्यात अव्वल ठरल्या ग्रामविकास व महिला-बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे.
भाजपा ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सत्तेवर आली.त तेव्हापासून आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या २८ बैठकी झाल्या. त्यातील ९ बैठकींना मुंडे उपस्थित नव्हत्या. त्या खालोखाल सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे -७ बैठकी, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत -६, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले - प्रत्येकी ५, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम - प्रत्येकी ४, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येकी तीन बैठकींना अनुपस्थित होते. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मुख्य सचिवांच्या कार्यालयातून मिळविली. (विशेष प्रतिनिधी)
------------------------
अनुपस्थितीची कारणे
अनुपस्थितीच्या कारणांबाबत काही मंत्र्यांशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, आपापल्या जिल्‘ात असलेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका, मंत्रिमंडळ बैठकीचा बदललेला दिवस, मतदारसंघातील न टाळता येण्यासारखे कार्यक्रम, श्राद्धासारखे कौटुंबिक दु:खाचे प्रसंग अशा विविध कारणांमुळे काही बैठकींना उपस्थित राहता आले नाही. प्रत्येक वेळी आम्ही अनुपस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घेतली होती, असे ते म्हणाले.

Web Title: Cabinet meeting held in Dandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.