शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्यप्रदेशात होणार मंत्रिमंडळ विस्तार; राजकीय नाट्यादरम्यान सरकारचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 03:31 IST

कमलनाथ यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपने १४ आमदार पळविले, असा आरोप काँग्रेसने अलीकडेच केला होता.

भोपाळ : मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपने अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर राज्यात चाललेल्या राजकीय नाट्यादरम्यान मध्यप्रदेश मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे.

कमलनाथ यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपने १४ आमदार पळविले, असा आरोप काँग्रेसने अलीकडेच केला होता.मध्यप्रदेश मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार करणार आहोत, असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. सत्तारूढ काँग्रेसच्या विविध गटांतील आमदार आणि मित्रपक्ष व अपक्षांचा मंत्रिमंडळात समावेश करणे, हे सरकारसाठी कठीण काम आहे, असे एका राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. २३० सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे ११४ आमदार असून बसपाचे दोन, समाजवादी पार्टीच्या एका आणि चार अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. भाजपचे १०७ आमदार असून दोन जागा रिक्त आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह राज्य मंत्रिमंडळात २९ सदस्य आहेत.३ आमदार नॉट रिचेबल१० आमदार मंगळवारी बेपत्ता झाले होते. त्यात दोन बसपा, एक सपा आणि एक अपक्ष आणि उर्वरित काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर काँग्रेसला सात आमदारांना परत आणण्यास यश आले. तथापि, काँग्रेसचे तीन आमदार हरदीप सिंह डांग, बिसाहूलाल सिंह आणि रघुराज कन्साना यांचा अद्याप ठावठिकाणा नाही.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा