नव्या EVM मशीनवर होणार मतदान, 'या' सरकारी कंपन्यांना मिळाली १३३५ कोटींची ऑर्डर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 16:17 IST2023-01-18T16:15:58+5:302023-01-18T16:17:09+5:30
२०२३ आणि २०२४ ही दोन वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहेत.

नव्या EVM मशीनवर होणार मतदान, 'या' सरकारी कंपन्यांना मिळाली १३३५ कोटींची ऑर्डर!
२०२३ आणि २०२४ ही दोन वर्ष भारतीय राजकारणासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. यंदाच्या वर्षात ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ज्यात ५ मोठ्या राज्यांचा समावेश आहे. तसंच पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्या ईव्हीएम मशीन्ससाठीची ऑर्डर दिली आहे. या सर्व मशीन्स सरकारी कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या दोन कंपन्यांना ऑर्डर देण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यांना कॅबिनेटकडूनही मंजुरी मिळाली आहे. सरकारनं इव्हीएम मशीन्ससाठी १,३३५ कोटी रुपयांचं बजेट राखून ठेवलं आहे.
हे झाले महत्वाचे निर्णय
१. मीडिया रिपोर्टनुसार नव्या ईव्हीएम मशीनसाठी कॅबिनेटनं मंजरी दिली आहे.
२. कॅबिनेटमध्ये नव्या ईव्हीएम सोबतच VV PATs ना अपग्रेड करण्यासही मंजुरी मिळाली आहे.
३. यावेळी सरकारनं या कामासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीला मंजुरी मिळाली आहे.
४. सुत्रांच्या माहितीनुसार ईव्हीएम खरेदीसाठी सरकारनं एकूण ११३५ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. ज्यात VV PATs नाही अपग्रेड केलं जाणार आहे.
५. अपग्रेडेशन अंतर्गत VV PATs ना M2 हून M3 मध्ये रिप्लेस केलं जाणार आहे.
या राज्यांमध्ये निवडणुकीची घोषणा
त्रिपुराच्या आगामी विधानसभा निवडणुकी अंतर्गत १६ फेब्रवारी रोजी मतदान होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये एकाच दिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत पूर्वोत्तर तीन राज्यांशी संबंधित निवडणूक तारखांची घोषणा केली. तिन्ही राज्यांमधील मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. निवडणूक तारीख घोषणा होताच तिनही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.