शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

CAA Protest: पोलीस हवालदाराच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये गोळी घुसली; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 8:43 AM

जमावाकडून झाडण्यात आलेली गोळी पोलीस कर्मचाऱ्याच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घुसली

आग्रा: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागलं असून पोलिसांवर हल्लेदेखील झाले आहेत. उत्तर प्रदेशात असे सर्वाधिक प्रकार घडले आहेत. शनिवारी उत्तर प्रदेशात आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलिसांवर गोळीबार झाला. त्यावेळी एका पोलिसाचा जीव थोडक्यात वाचला. जॅकेटमध्ये असलेल्या पाकिटामुळे पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण वाचले. फिरोजाबादमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार विजेंद्र कुमार आणि त्यांचे सहकारी धर्मेंदर यांच्यावर शनिवारी गोळीबार झाला. धर्मेंदर यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विजेंद्र कुमार यांच्या दिशेनंदेखील गोळीबार झाला. बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घुसली. मात्र विजेंद्र कुमार अतिशय सुदैवी ठरले. जमावाकडून झाडली गेलेली गोळी जॅकेटच्या वरील बाजूस असलेल्या खिशाला लागली. या खिशात विजेंद्र यांनी पाकिट ठेवलं होतं. जमावाकडून झाडलेली गोळी याच पाकिटात घुसली आणि विजेंद्र यांचा जीव वाचला.उत्तर प्रदेश पोलीस दलात सध्या याच घटनेची चर्चा आहे. हा माझा पुनर्जन्म असून त्याबद्दल मी देवाचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया विजेंद्र कुमार यांनी व्यक्त केली. 'मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गोळीबार होत असताना आम्ही जमावाचा पाठलाग करत होतो. त्यावेळी एक गोळी माझ्या बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये घुसली. ती गोळी छातीवरच लागणार होती. मात्र नेमकं त्याच जागी माझं पाकिट होतं. ती गोळी त्या पाकिटात घुसली. त्या पाकिटात मी भगवान शंकराचा फोटो ठेवला होता,' अशा शब्दांत विजेंद्र यांनी त्यांच्या सोबत घडलेला प्रसंग सांगितला. आंदोलनांदरम्यान पोलीस मोठ्या प्रमाणावर लक्ष्य होत असल्याचं फिरोजाबाद पोलीस ठाण्याचे अधीक्षक सचिंद्र पटेल यांनी सांगितलं. 'हिंसक जमावानं पोलिसांवर गोळीबार केला. विजेंद्र यांचं नशीब बलवत्तर असल्यानं त्यांचा जीव वाचला. जमावानं केलेल्या दगडफेकीत ४० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत', अशी माहिती पटेल यांनी दिली. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक