शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 16:42 IST

आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळून विजयी झाले. तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८  हजार ३२५ मते, काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली. 

अहमदाबाद - दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने जबरदस्त कमबॅक केला आहे. आप पक्षाने भाजपाचा गड असलेल्या गुजरातमध्ये विसावदर मतदारसंघात त्यांचा कब्जा कायम ठेवला आहे. या जागेवरून आम आदमी पक्षाने माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना मैदानात उतरवले होते. या पोटनिवडणुकीत गोपाल इटालिया यांनी काही राऊंड वगळता २१ राऊंडमध्ये हजारो मतांची आघाडी घेतली. त्यांनी भाजपाचे उमेदवार किरीट पटेल यांना १७ हजार मतांनी मात दिली आहे. दिल्लीत झालेल्या पराभवानंतर गुजरातमधील आपचा विजय पक्षाला संजीवनी देणारा आहे.

या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्ष वरचढ असल्याचे दिसत होते परंतु आम आदमी पक्षाने आखलेली व्यूहरचना विसावदरमध्ये भाजपाच्या पराभवाचे कारण बनली. भाजपाने या जागेवर विजयासाठी २००७ पासून वाट पाहत आहे. या पोटनिवडणुकीत एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यात आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांना ७५ हजार ९०६ मते मिळून विजयी झाले. तर भाजपाचे किरीट पटेल यांना ५८  हजार ३२५ मते, काँग्रेसचे नितीन रणपारिया यांना ५ हजार ४९१ मते मिळाली.  आपचे भूपेंदर भयाणी हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. 

काय आहे आपच्या विजयाची ५ कारणे?

सर्वात आधी उमेदवाराच्या नावाची घोषणा - आम आदमी पक्षाने गुजरातमध्येही पंजाबचा फॉर्म्युला वापरला. दिल्ली निवडणुकीतील पराभवानंतर विसावदर जागेवर निवडणूक आयोगाने तारीख घोषित करण्यापूर्वीच आपने उमेदवार निश्चित केला. त्यात भाजपामध्ये उमेदवारीबाबत शेवटपर्यंत गोंधळ सुरू होता तिथे आम आदमी पक्ष प्रचारात गुंतला होता.

मोठ्या चेहऱ्यावर लावला डाव  - गुजरातमधील ही जागा वाचवण्यासाठी आम आदमी पक्षाने त्यांच्या पक्षातील बड्या चेहऱ्यावर डाव लावला. गोपाल इटालिया या मतदारसंघातील रहिवासी नाहीत परंतु पूर्ण विधानसभा मतदारसंघात त्यांनी २-३ दौरे करून लोकांमध्ये त्यांचा जम बसवला. त्यांनी लोकांमधील संपर्क वाढवला. त्यामुळे सत्तेत असूनही भाजपा उमेदवार प्रचारात मागे पडले. गोपाल इटालिया यांच्यासमोर किरीट पटेल कमकुवत ठरले.

केजरीवाल यांच्या चॅलेंजने वातावरण बदलले - २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपवर विश्वास ठेवला मात्र भूपेंदर भयाणी यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला झटका बसला. गोपाल इटालिया यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अरविंद केजरीवाल पोहचले होते. त्यावेळी त्यांनी जाहीरपणे जर भाजपाने गोपाल इटालिया यांना खरेदी केले तर मी राजकारण सोडेन असं विधान केले. त्यांच्या या विधानामुळे विसावदर मतदारसंघात गोपाल इटालिया यांना हिरो केले. 

भाजपाला मुद्द्यावर घेरले - विसावदर येथे मागील निवडणुकीत आपचा विजय झाला तेव्हा गोपाल इटालिया प्रदेशाध्यक्ष होते. या निवडणुकीत सूरतच्या कतारगाम येथे ते लढले होते परंतु यावेळी विसावदर येथे त्यांनी फोकस ठेवला. उमेदवार म्हणून त्यांनी होमवर्क केला, असे सगळे मुद्दे उपस्थित केले ज्यात सत्ताधारी भाजपाला घेरता येईल. गोपाल इटालिया यांनी जनतेमध्ये राहून सत्ताधारी भाजपाची गोची केली. 

इसुदान गढवीने बूथ मजबूत केले - पत्रकारितेतून राजकारणात आलेले इसुदान गढवी यांनी या पोटनिवडणुकीत प्रदेशाध्यक्षाची भूमिका निभावली. सौराष्टमधून आलेले इसुदान गढवी यांनी विसावदरमध्ये गोपाल इटालिया यांना उतरवण्यापूर्वी सर्व्हे घेतला आणि पक्ष कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर ११ नेत्यांच्या कोअर कमिटीने एक बूथवर फोकस केले. त्यामुळे भाजपाचा पराभव आणि काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीBJPभाजपाGujaratगुजरातElectionनिवडणूक 2024