शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

फुलपूर: पंतप्रधानांसह दिग्गज नेत्यांना लोकसभेत पाठवणारा मतदारसंघ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:12 IST

भारताला पहिले पंतप्रधान देणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे.

मुंबई- उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. भारताला पहिले पंतप्रधान देणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे. आज केशवप्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे येथे पोटनिवडणूक घ्यावी लागली. अनेक फुलपूरची ओळख अनेक पोटनिवडणुकांना सामोरे जाणार मतदारसंघ अशीही आहे.1952 साली पहिल्या लोकसभेत पं. जवाहरलाल नेहरु यांनी याच मतदारसंघातून प्रवेश केला होता. त्यानंतर 1957 आणि 1962 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही पं. नेहरु याच मतदारसंघातून विजयी झाले होते. १९६४ साली पं. जवाहरलाल नेहरु यांचे निधन झालेल्या पोटनिवडणुकीत विजयालक्ष्मी पंडित विजयी झाल्या. त्यानंतर 1967 साली त्या पुन्ही विजयी झाल्या. 1969 साली पुन्हा पोटनिवडणुकीत संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर जनेश्वर मिश्रा विजयी झाले. 1971 साली व्ही. पी. सिंग काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेले. प्रथमच लोकसभेत जाणाऱ्या व्ही. पी. सिंग यांना वाणिज्य मंत्रालयाचे उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1976 साली त्यांच्याकडे मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आली. 1980 साली ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तर 1989-90 या एका वर्षाच्या काळासाठी ते भारताचे पंतप्रधान होते. 1977 साली भारतीय लोकदलाच्या तिकिटावर कमला बहुगुणा यांना फुलपूरच्या खासदार झाल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या त्या पत्नी होत्या. 1980 साली झालेल्या निवडणुकीमध्ये जनता दलाचे बी. डी. सिंग यांनी विजय मिळवला. त्यानंतर 1996 आणि 1998 असे सलग दोनदा समाजवादी पार्टीचे जंग बहादूर पटेल विजयी झाले. त्यानंतर 1999 साली समाजवादी पक्षाचे धर्मराज पटेल आणि 2004 साली अतिक अहमद यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्तव करण्याची संधी मिळाली. 2009 साली येथून कपिलमुनी करवारिया हे बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत गेले आणि 2014 साली पहिल्यांदाच भाजपाला केशव प्रसाद मौर्य यांच्या निमित्ताने ही जागा आपल्याकडे घेता आली. उत्तर प्रदेशातील बहुतांश सगळ्या महत्त्वाच्या पक्षांना या मतदारसंघाने आजवर एकदा तरी संधी दिली आहे. पंतप्रधान, पंतप्रधानांची बहिण, भावी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची पत्नी, भावी उपमुख्यमंत्री यांना लोकसभेत पाठवणारा हा एकमेवाद्वितीय मतदारसंघ असावा.

टॅग्स :Electionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश