शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

UP Bye Election Results 2018: योगींचा बालेकिल्ला ढासळला; गोरखपूर मतदारसंघात सपाची 15000 मतांनी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 15:22 IST

या दोन जागांवरील लढत ही भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

लखनऊ: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहार येथील पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर होत आहेत. या दोन जागांवरील लढत ही भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे यापैकी एकाही जागेवर पराभव झाल्यास भाजपासाठी हा मोठा धक्का असू शकतो. तसेच या विजयामुळे भाजपाविरोधात एकटवण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांचे मनोबलही वाढू शकते. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघात रविवारी पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले होते. याशिवाय, बिहारमधील अरारिया या लोकसभा मतदारसंघातील तसेच बभुआ आणि जेहनाबाद या विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक पार पडली होती.नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षाने गोरखूपर मतदारसंघात निसटती आघाडी घेतली आहे. तर फुलपूर मतदारसंघातही सपाने तब्बल 12000 मतांची आघाडी मिळवली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकांसाठी एकत्र येण्याचा सपा आणि बसपाचा निर्णय योग्य असल्याचे दिसून येत आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर तर केशवप्रसाद मौर्य हे फूलपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. या दोन्ही जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. फुलपूरमध्ये ३८ टक्के तर गोरखपूरमध्ये ४७ टक्के मतदान झाले होते. गोरखपूरमधून भाजपाकडून उपेंद्र दत्त शुक्ला, काँग्रेसकडून सुरीता करिम, समाजवादीकडून प्रवीण निशाद रिंगणात होते. तर फुलपूरमधून भाजपाकडून कौशलेंद्र सिंह पटेल, समाजवादी पक्षाकडून नागेंद्र प्रतापसिंह पटेल तर काँग्रेसकडून मनीष मिश्रा रिंगणात आहेत.

 

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा