कृउबा बंद पाडण्याचा खरेदीदारांचा प्रयत्न किरकोळ खरेदीदारांनी पुकारला बंद: शेतकर्यांचे हाल झाल्याने काकडी फेकली; अडत कमी करण्याची मागणी
By Admin | Updated: July 19, 2016 23:41 IST2016-07-19T23:41:00+5:302016-07-19T23:41:00+5:30
जळगाव : सहा टक्के अडत व एक टक्का बाजार समिती शुल्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी मंगळवारी बंद पुकारला. काही खरेदीदारांनी शेतकरी व इतर ठिकाणाहून आलेल्या खरेदीदारांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे काही वेळ शेतकर्यांचा माल पडून राहीला. एका शेतकर्याने आपली काकडीही यार्डात फेकली. वाद वाढत असल्याचे लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.

कृउबा बंद पाडण्याचा खरेदीदारांचा प्रयत्न किरकोळ खरेदीदारांनी पुकारला बंद: शेतकर्यांचे हाल झाल्याने काकडी फेकली; अडत कमी करण्याची मागणी
ज गाव : सहा टक्के अडत व एक टक्का बाजार समिती शुल्कावरून निर्माण झालेल्या वादामुळे बाजार समितीमधील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी मंगळवारी बंद पुकारला. काही खरेदीदारांनी शेतकरी व इतर ठिकाणाहून आलेल्या खरेदीदारांना प्रवेशद्वाराजवळच रोखले. यामुळे काही वेळ शेतकर्यांचा माल पडून राहीला. एका शेतकर्याने आपली काकडीही यार्डात फेकली. वाद वाढत असल्याचे लक्षात घेता पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. नंतर किरकोळ खरेदीदारांची बाजार समिती प्रशासनाने समजूत घातली. थेट खरेदी विक्री व्हावी यासाठी बाजार समिती प्रशासनाने शेतकरी व किरकोळ खरेदीदार यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. बाजार समितीमध्ये अडतदार व खरेदीदार किंवा किरकोळ व्यापारी यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार समिती शुल्कावरून सोमवारी वाद झाल्याचे पडसाद मंगळवारीही उमटले. खरेदी-विक्री न करण्याचा निर्णयफळे व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळीच शेतकर्यांनी आपला शेतमाल आणला. परंतु आपण शेतमाल खरेदी करणार नाही. जे शेतकरी व किरकोळ खरेदीदार मार्केटमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना काही किरकोळ खरेदीदार अडवित होते. सहा टक्के अडत कमी करा, अशी मागणी काही खरेदीदारांनी केली व फळे आणि भाजीपाला मार्केटचे प्रवेशद्वार बंद केले. बाजार समिती प्रशासनाने लागलीच पोलिसांना बोलावले. नंतर किरकोळ खरेदीदार नरमले व ते यार्डात भाजीपाला खरेदीसाठी तयार झाले. ५०० क्विंटल भाजीपाल्याची विक्री फळे व भाजीपाला मार्केट यार्डात शेतकरी व किरकोळ खरेदीदार थेट सौदे करू शकतात. त्यांनी थेट खरेदी विक्री केली तर शुल्काची गरज नाही. त्यांच्या वाहनांकडूनही कोणताही कर आकारला जाणार नाही, असे सांगितले. सुमारे १० ते १२ कर्मचारी बाजार समिती प्रशासनाकडून आले. यानंतर यार्डात शेतकरी व किरकोळ खरेदीदार किंवा व्यापारी यांच्यात सौदे झाले. सुमारे ५०० क्विंटल भाजीपाल्याची खरेदी व विक्री नंतर झाली. काही शेतकरी वैतागलेबाजार समितीमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे शेतकरी वैतागले. एका शेतकर्याने मार्केटच्या यार्डात आपली काकडी फेकली. आम्ही घाम गाळून शेतमाल पिकवितो, परंतु त्याला मोल नाही, असे काही शेतकरी म्हणाले. सहा टक्के अडत व एक टक्का बाजार शुल्क सध्या वसूल केले जात आहे. खरेदीदारांनी सुरुवातीला वाद घातला. नंतर मात्र त्यांनी शेतमाल खरेदी केला.-प्रकाश नारखेडे, सभापती, बाजार समिती