शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल भरा अन् मिळवा बाईक, लॅपटॉप फ्री फ्री फ्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 12:30 IST

इंधन विक्री कमी होऊ नये म्हणून पेट्रोल पंप मालकांच्या ऑफर

भोपाळ: पेट्रोल, डिझेल भरा आणि बाईक, लॅपटॉप, एसी, वॉशिंग मशीन मोफत मिळवा, अशी ऑफर मध्य प्रदेशातील अनेक पेट्रोल पंपांच्या मालकांकडून दिली जात आहे. सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंधन विक्री कायम राहावी, यासाठी पेट्रोल पंप मालकांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. मध्य प्रदेश सरकार पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट लावतं. त्यामुळे इंधनाचे दर भडकले आहेत. राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर जास्त असल्यानं मध्य प्रदेशातील अनेक ट्रक, टेम्पो चालक राज्याबाहेर जाऊन इंधन भरतात. यासोबतच सीमावर्ती भागात राहणारे नागरिकही दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरतात. याचा फटका राज्यातील पेट्रोल पंप मालकांना बसतो आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता पेट्रोल पंप मालकांनी अनेक योजना आणल्या आहेत. काही पेट्रोल पंप मालक 100 लिटर डिझेल भरल्यावर ट्रक चालकांना मोफत चहा आणि नाश्ता देत आहेत. तर काही पेट्रोल पंप मालकांनी 5 हजार लिटर डिझेल खरेदीवर मोबाईल, सायकल आणि मनगटी घड्याळ मोफत दिलं जाईल, असे फलक लावले आहेत. 15 हजार लिटर डिझेल खरेदी करा आणि कपाट, सोफा सेट, 100 ग्रॅमचं चांदीचं नाणं मिळवा, अशाही ऑफर देण्यात येत आहेत. तर 25 हजार लिटर खरेदी केल्यावर ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, 50 हजार लिटर डिझेल खरेदीवर स्प्लिट एसी, 1 लाख लिटरच्या खरेदीवर स्कूटर किंवा मोटारसायकल मोफत अशा ऑफरदेखील पेट्रोल पंप मालकांनी दिल्या आहेत.  

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेल