लोणीची यात्रा उत्साहात
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
लोणी-धामणी : महाशिवरात्रीचे निमित्त साधून शेकडो भाविकांनी लोणी (ता.आंबेगाव ) येथील शंभो महादेवाचे दर्शन घेतले. येथील यात्रा उत्साहात झाली.

लोणीची यात्रा उत्साहात
ल णी-धामणी : महाशिवरात्रीचे निमित्त साधून शेकडो भाविकांनी लोणी (ता.आंबेगाव ) येथील शंभो महादेवाचे दर्शन घेतले. येथील यात्रा उत्साहात झाली.पहाटेच ग्रामस्थांच्या वतीने शंभो महादेवास अभिषेक घालण्यात आला. भाविकांनी सकाळीच रांगा लावून हर हर महादेव गर्जत पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.सकाळी ११ वाजता गावातून वाजतगाजत मशालीची मिरवणूक काढून त्याने दीपमाळ प्रज्वलित करण्यात आली. या यात्रेचे नियोजन सरपंच सावळेराम नाईक, पिंटू पडवळ, अशोक आदक-पाटील, जगन लंके, ह.भ.प. बबनमहाराज शिनलकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश वाळूंज,भगवान शिनलकर, बाळासाहेब वाळूंज, वसंत वाळूंज आदींनी केले.