राजस्थानात बससेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:20 IST2018-09-22T05:20:54+5:302018-09-22T05:20:56+5:30
राजस्थान रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरू राहिल्याने बससेवा ठप्प राहिली.

राजस्थानात बससेवा ठप्प
जयपूर : राजस्थान रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप पाचव्या दिवशीही सुरू राहिल्याने बससेवा ठप्प राहिली. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, एसटीमध्ये नवीन भरती करावी, यासह अनेक मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
कामगारांच्या विविध संघटनांनी या संपाला पाठिंबा दर्शवला. राज्यातील ५२ डेपोंमधील सुमारे १६ हजार कर्मचाºयांच्या संपामुळे ४,७०० बसेसची चाके पाचव्या दिवशीही हलली नाहीत. संप मिटवण्यासाठी सरकारकडून कसल्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत, असा आरोप करण्यात आला.