बस नदीत कोसळून ४३ ठार
By Admin | Updated: April 20, 2017 00:47 IST2017-04-20T00:47:21+5:302017-04-20T00:47:21+5:30
हिमाचल प्रदेशच्या नेरवा भागातील गुम्मा येथे प्रवासी बस नदीत कोसळून ४४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त खासगी बस टोन्स नदीत कोसळली.

बस नदीत कोसळून ४३ ठार
शिमला : हिमाचल प्रदेशच्या नेरवा भागातील गुम्मा येथे प्रवासी बस नदीत कोसळून ४४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त खासगी बस टोन्स नदीत कोसळली. गुम्मा येथे ही दुर्घटना घडली. पोलिसांनी मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त केली असून आकडा ५६ पर्यत पोहोचण्याची शक्यता आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही खासगी बस उत्तराखंडमधील तुनी येथून सकाळी निघाली होती. बसच्या अपघाताची माहिती मिळताच सिरमोर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्याला सुरुवात केली आहे. शिमल्याहून हे ठिकाण शिमला जिल्ह्यात असले तरी शहरापासून १९0 किलोमीटर दूर असल्याने शिमला पोलिसांना दुर्घटनास्थळी पोहोचण्यास बराच विलंब झाला. मात्र वैद्यकीय पथक तसेच मदत व पुनर्वसन अधिकाऱ्यांनी तिथे लगेचच धाव घेतली.