हिमालच प्रदेशात बस नदीत कोसळून 44 प्रवाशांचा मृत्यू

By Admin | Updated: April 19, 2017 13:44 IST2017-04-19T13:08:01+5:302017-04-19T13:44:10+5:30

हिमाचल प्रदेशात बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 44 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे

Bus collides with bus in Himalayas, 44 passenger deaths | हिमालच प्रदेशात बस नदीत कोसळून 44 प्रवाशांचा मृत्यू

हिमालच प्रदेशात बस नदीत कोसळून 44 प्रवाशांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत
शिमला, दि. 19 - हिमाचल प्रदेशात बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 44 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त खासगी बस टोन्स नदीत कोसळून हा अपघात झाला आहे. नेरिया भागातील गुम्मा येथे ही दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त केली असून आकडा 56 पर्यत पोहोचण्याची शक्यता आहे. बचावपथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
 
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त खासगी बस उत्तराखंडमधील तियुनी येथून सकाळी निघाली होती. बसच्या अपघाताची माहिती मिळताच सिरमोर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्याला सुरुवात केली आहे. शिमला पोलीस मात्र अद्याप घटनास्थळी पोहोचू शकलेले नाहीत. 
 

Web Title: Bus collides with bus in Himalayas, 44 passenger deaths