शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दिल्लीत नोकरशहांना मोदी-शाह यांचा धाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 11:20 IST

Bureaucrats: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमध्ये नवी कार्यसंस्कृती आणल्याने नोकरशहांना त्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या नोकरशहांना मोदींच्या कार्यशैलीची सवय नसल्याने ते सोयीच्या जागेसाठी इतर मार्ग निवडत आहेत

- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमध्ये नवी कार्यसंस्कृती आणल्याने नोकरशहांना त्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या नोकरशहांना मोदींच्या कार्यशैलीची सवय नसल्याने ते सोयीच्या जागेसाठी इतर मार्ग निवडत आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण दिल्लीत जाण्यासाठी उत्सुक नाहीत. कारण, राजधानीतील नियुक्ती आता फायदेशीर राहिलेली नाही.

कल दर्शवितो की, अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवा कार्यकाळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्हीआरएसचा (स्वेच्छानिवृत्ती) पर्याय निवडला. सप्टेंबर २०२२ पर्यंत तब्बल ८ आयएएस अधिकाऱ्यांनी व्हीआरएस घेतला. बहुतांश अधिकारी त्यांच्या मूळ केडरच्या राज्यात परत गेले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांच्या मंत्रालयात सर्वाधिक राजपत्रित अधिकाऱ्यांना बाहेरचा दरवाजा दाखवून विक्रम केला आहे. २०१९ पासून गृहमंत्रालयात अमित शाह यांच्या कार्यकाळात दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. अमित शाह हे २०२१ पासून दर आठवड्याला एका राजपत्रित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करत आहेत. यात बडतर्फ करणे, काढून टाकणे आणि सक्तीची सेवानिवृत्ती यांचा समावेश आहे. अमित शाह हे नियुक्तीवरील कॅबिनेट समितीचे सदस्यदेखील आहेत जे उच्च नोकरशहा यांच्या नियुक्त्या, बदल्या आणि बडतर्फीच्या कार्यवाही करतात.

आकडे काय सांगतात...गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत शिस्तभंगाची २३७ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. तर, २४९ राजपत्रित अधिकाऱ्यांविरुद्ध दक्षता प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत. याच कारणामुळे पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त सचिव आणि त्याहून वरिष्ठ स्तरावर लॅटरल एन्ट्रंट मार्गाने (खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना सरकारी विभागांमध्ये नियुक्त्या) नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला. 

१० अधिकारी बरखास्तया मंत्रालयाने दहा राजपत्रित अधिकाऱ्यांना बरखास्त केले आहे. २०२१ मधील ही सर्वाधिक संख्या आहे. तर, २०१९ आणि २०२० मध्ये प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. २०२१ मध्ये ५२ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली होती.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह