शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

रेल्वे रुळावर नोटांची बंडले, ५००-२००० रुपयांच्या नोटांचा खच, पाहून कर्मचाऱ्यांनाही बसला धक्का, आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 14:03 IST

Cash Found on Railway Track: तामिळनाडूमधील धर्मपुरी येथे रेल्वे रुळावर नोटांची बंडले आणि ५०० तसेच २००० हजार रुपयांचा नोटांचा खच पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

चेन्नई - तामिळनाडूमधील धर्मपुरी येथे रेल्वे रुळावर नोटांची बंडले आणि ५०० तसेच २००० हजार रुपयांचा नोटांचा खच पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. (Cash Found on Railway Track) मात्र या नोटा ताब्यात घेण्यासाठी रेल्वे कर्मचारी जेव्हा या नोटांच्या गठ्ठ्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना अजून एक धक्का बसला. या सर्व नोटा नकली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रेल्वे पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. आता पोलीस या नोटांबाबत अधिक तपास करत आहेत.(Bundles of notes on the railway tracks, the cost of Rs 500-2000 notes, the staff was shocked to see )

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धर्मपुरीजवळ रेल्वे ट्रॅकवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी २००० आणि ५०० रुपयांच्या नकली नोटा पाहिल्या. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. रेल्वे कर्मचारी रामकुमार हा बंगळुरूहून सालेमच्या दिशेना जाणाऱ्या मार्गावर थोपपूरजवळ रुळांच्या देखभालीसाठी जात होता. तेव्हा त्याला दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा ट्रॅकवर मिळाल्या.

रामकुमार याने त्वरित याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सब-इंस्पेक्टर वेंकटचलम यांच्या नेतृत्वाखाली एक टिम घटनास्थळी पोहोचली. त्यांनी दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा तपासल्या. तेव्हा या नोटा नकली असल्याचे दिसून आले. या नोटांमध्ये एक कार्टुन छापलेले होते.

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी विखुरलेल्या या नोटा जप्त केल्या आहेत. नोटांचे हे बंडल एका बॉक्समध्ये पॅक केले होते. त्यामुळे संशय निर्माण होत आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :MONEYपैसाrailwayरेल्वेTamilnaduतामिळनाडू