शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काळाची झडप! कार-बाईकचा भीषण अपघात; लग्नाच्या 15 दिवस आधी वरासह 2 मित्रांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:32 IST

अपघातातील एकाचा 15 दिवसांनी विवाह होणार होता. लग्नाचे साहित्य खरेदी करून ते परतत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला.

नवी दिल्ली - राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील हिंदौली परिसरात कार आणि बाईकचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे अपघातातील एकाचा 15 दिवसांनी विवाह होणार होता. लग्नाचे साहित्य खरेदी करून ते परतत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला. काळाने झडप घातली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत. 

लग्नामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. जोरदार तयारी सुरू होती असं असताना कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील हिंडौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काछी घाटीजवळ रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात घडला. त्यावेळी प्रेमचंद कहार (25), प्रदीप कहार (17) आणि नितेश कहार (20) हे एकाच बाईकवरून जात होते. 

जयपूरहून कोटाकडे जाणाऱ्या कारला त्यांच्या बाईकची जोरदार धडक बसली. या अपघातात तीनही तरुण गंभीर जखमी झाले होते. हिंदौली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश बाबू यांनी ही माहिती दिली की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची परिस्थिती पाहता डॉक्टरांना त्यांना कोटा येथे पाठवले. 

कोटा येथे उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मृतांमधील प्रेमचंद कहार याचे 15 मेला लग्न होणार होते. यांचसंदर्भात खरेदीसाठी तीनही जण हिंदौली येथे गेले होते. खरेदी झाल्यानंतर ते डोडूंदा येथे परतत होते. याचवेळी ही भीषण दुर्घटना घडली. प्रेमचंदच्या मृत्यूनंतर परिवारात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Accidentअपघातmarriageलग्न