शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

बुलेट ट्रेनचे नियोजित भाडे ३,३०० रुपये

By admin | Published: May 05, 2016 4:05 AM

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या ‘बुलेट ट्रेन’चे भाडे रेल्वेच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या प्रचलित भाड्याच्या दीडपट ठेवण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती

नवी दिल्ली : मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या ‘बुलेट ट्रेन’चे भाडे रेल्वेच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या प्रचलित भाड्याच्या दीडपट ठेवण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती सरकारने बुधवारी संसदेत दिली.भारतीय रेल्वेच्या दुरान्तो एक्स्प्रेसचे मुंबई-अहमदाबाद प्रवासाचे सध्याचे वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या प्रवासाचे भाडे २,२०० रुपये आहे. म्हणजेच पूर्णपणे स्वतंत्र मार्गावरून भन्नाट वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे याच प्रवासाचे भाडे सुमारे ३,३०० रुपये असेल. जपानमध्ये ‘शिंकान्सेन’ नावाच्या अशाच बुलेट ट्रेन धावतात. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपानचे हेच तंत्रज्ञान वापरले जाणार आहे व या नव्या रेल्वेच्या बांधणीसाठी जपान सरकार अत्यल्प व्याजदराने वित्तसाह्यही देणार आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यानचे अंतर ५०८ किमी आहे. साधारण तेवढ्याच अंतरासाठी जपानमध्ये तोक्यो ते ओसाका शहरांमध्ये धावणाऱ्या शिकान्सेनचे सध्याचे भाडे भारतीय चलनात रूपांतर केले तर सुमारे ८,५०० रुपये आहे. जपानच्या वित्तसाह्याने भारतात धावणाऱ्या ‘बुलेट ट्रेन’चे भाडे जपानच्या तुलनेत निम्म्याहून कमी असणार आहे!रेल्वे राज्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनविषयी दिलेली अन्य ठळक माहिती अशी -- पहिल्या टप्प्यात कमाल वेगक्षमता ताशी ३५० किमी, प्रत्यक्ष धावण्याचा वेग ताशी ३२० किमी- मार्गावर मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भजोच, बडोदा, आणंद, अहमदाबाद व साबरमती अशी एकूण १२ स्टेशन्स- प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च ९७,६३६ कोटी रुपये- गाडी सर्व स्थानकांवर थांबल्यास प्रवासाचा वेळ 2.58 तास. काही स्थानके वगळून जलद धावल्यास २ तास ७ मिनिटे