बुलेट ट्रेनचा उपयोग ९९ टक्क्यांना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:48 IST2018-04-28T00:48:20+5:302018-04-28T00:48:20+5:30
बुलेट ट्रेनमधून ९९ टक्के लोक कधीच प्रवास करणार नाहीत.

बुलेट ट्रेनचा उपयोग ९९ टक्क्यांना नाही
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित करत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, एकीकडे मानवरहित क्रॉसिंगवर १३ मुलांचा मृत्यू होतो, तर दुसरीकडे बुलेट ट्रेनसाठी लाखो कोटी रुपये खर्च केला जात आहे. ज्या दिवशी एक लाख कोटींच्या बुलेट ट्रेनसाठी ७७ हेक्टर जमीन देण्यात आली, त्याच दिवशी १३ मुलांचा क्रॉसिंगवर मृत्यू झाला. बुलेट ट्रेनमधून ९९ टक्के लोक कधीच प्रवास करणार नाहीत.