शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Bulandshahr Violence : 'उत्तर प्रदेशमध्ये मॉब लिंचिंग नाही, बुलंदशहर ही एक दुर्घटना'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 11:50 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची जमावाकडून झालेली हत्या हा अपघात असल्याचं वक्तव्य केलं आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांची जमावाकडून झालेली हत्या हा अपघात असल्याचं वक्तव्य केलं आहे. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली आणखी पाच जणांना अटक केली आहे.हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या जितू नावाच्या लष्करी जवानाचा पोलीस शोध घेत आहेत.

लखनौ  - गोहत्या झाल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांचा मृत्यू  झाला होता. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांची जमावाकडून झालेली हत्या हा अपघात असल्याचं वक्तव्य केलं आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. हे वक्तव्य करण्याच्या एक दिवस आधी सिंह यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. ही हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी कुटुंबियांना दिले.

‘उत्तर प्रदेशात जमावाकडून मारहाणीची कोणतीही घटना घडलेली नाही. बुलंदशहरमधील घटना एक दुर्घटना आहे. यामध्ये कायदा आपलं काम करत आहे. दोषींना सोडलं जाणार नाही. गोहत्येवर संपूर्ण उत्तर प्रदेशात बंदी आहे. यासाठी अधिकारी उत्तरदायी असतील’, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली आणखी पाच जणांना अटक केली आहे. तसेच हिंसाचारात गोळीबार करणाऱ्या जितू नावाच्या लष्करी जवानाचा पोलीस शोध घेत आहेत. तो जम्मूत असल्याची माहिती मिळताच, त्याच्या शोधासाठी पोलीस तिथे गेले आहेत. या हिंसाचारात पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्यासह एका तरुणाचा मृत्यू झाला होता.

हिंसाचाराच्या काही व्हिडिओ फिती पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. त्या बारकाईने पाहिल्यानंतर त्यात एक लष्करी जवान गोळीबार करीत असल्याचे दिसले होते. त्याचे नाव जितू असून, एफआयआरमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याने झाडलेल्या गोळ्यांनीच सुबोधकुमार सिंह व सुमितकुमार या युवकाचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. हा जवान बुलंदशहर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. हिंसाचारानंतर हा लष्करी जवान तिथून गायब झाला आहे. हा जवान सुट्टी घेऊन गावी परतला होता व त्यानंतर पुन्हा जम्मूमध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी हजर झाला, असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले; मात्र तो अद्याप रुजू झालेला नसल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. हिंसाचारासंदर्भात हाती लागलेल्या व्हिडिओमधील सर्व आरोपींचा कसून शोध सुरू आहे. 

एकाच पिस्तुलाने दोघांची हत्या 

पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह व सुमितकुमार यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलाने झाली आहे. ते 0.32 बोअर प्रकारातील पिस्तूल असावे, असा कयास आहे. सुबोधकुमार सिंह यांच्याकडे याच प्रकारचे सर्व्हिस पिस्तूल होते. हिंसाचार करणाऱ्यांनी ते पिस्तूल पळविल्याचा संशय आहे. गोहत्या केल्याच्या कारणावरून जमावाने सुमारे तीन तास हिंसाचार चालविला होता. त्यांची पोलीस व सुरक्षा दलाच्या जवानांशी चकमक झाली. जमावाने वाहने व एक पोलीस चौकीही जाळली.

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथPoliceपोलिस