जिल्हा परिषदेची २७ मे रोजी अर्थसंकल्पीय सभा

By Admin | Updated: May 9, 2014 19:26 IST2014-05-09T19:26:58+5:302014-05-09T19:26:58+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २७ मे रोजी दुपारी एक वाजता होत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मार्च महिन्यात जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर झाला नव्हता.

The budget session of the Zilla Parishad on 27th May | जिल्हा परिषदेची २७ मे रोजी अर्थसंकल्पीय सभा

जिल्हा परिषदेची २७ मे रोजी अर्थसंकल्पीय सभा

वडणूक बंदोबस्त : राहण्याचे अन् खाण्याचेही वांधे
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत असून, ते सुरक्षित वातावरणात व्हावे यासाठी परजिल्‘ातील गृहरक्षक दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. परंतु त्यांची ज्या पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनीच या जवानांना वार्‍यावर सोडले असून, त्यांचे खाण्या-पिण्याचे वांधे झाले आहेत.
महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील मतदान उद्या होत असून, ते शांततेत व सुरक्षित वातावरण पार पडावे यासाठी ज्या जिल्‘ांमध्ये मतदान आहे त्याठिकाणी परजिल्‘ातील गृहरक्षक दलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत.
नाशिक लोकसभेसाठीही उद्या मतदान होत असून, सुरक्षेच्या हेतूने नांदेड जिल्‘ातील सुमारे ३५० होमगार्ड्स निवडणूक बंदोबस्तासाठी सोमवारीच शहरात दाखल झाले आहेत. सायंकाळी त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये बंदोबस्ताची नियुक्ती मिळाली. परजिल्‘ातून आलेल्या या होमगार्डच्या जवानांची राहण्याची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे पोलीस यंत्रणा वा जिल्हा प्रशासनाने करणे गरजेचे असताना तशी कोणतीही व्यवस्था या जवानांची करण्यात आलेली नाही.
गंगापूररोड, भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या होमगार्डच्या जवानांना राहण्यासाठी बराकी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र सरकारवाडा, सातपूर पोलीस ठाण्याकडून कोणतीही सोय या जवानांची करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जवानांना स्वत:च्या खर्चाने खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागली आहे, तर राहण्यासाठी आडोसा शोधावा लागला आहे. काही पोलीस ठाण्यांकडून होमगार्डच्या जवानांना केवळ तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले; पण ते शिजवायचे कुठे, असाही प्रश्न या जवानांसमोर होता.
दरम्यान, ज्या जवानांची पोलीस ठाण्यात नियुक्ती झालेली नाही ते पोलिसांच्या राखीव पथकासमवेत असून, त्यांचीही कोणतीही व्यवस्था नाही. या जवानांना सोमवारची रात्र सीबीएस, मेळा बसस्थानकावर काढावी लागली. होमगार्ड्सच्या जवानांनी सकाळी चहा-बिस्किटांचा नाश्ता केला, तर दुपारीही हॉटेलमध्ये स्वखर्चाने जेवण करावे लागले. सार्‍या बाबींचे वांधे झाल्याने होमगार्ड जवानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

फोटो : २३पीएचएपी९७
बसच्या आडोशाला विश्रांती घेताना होमगार्ड्स.
२३पीएचएपी१०८
सार्वजनिक पाणपोईवर पाणी पिताना होमगार्ड.
२३पीएचएपी१६९ ते १७१
बिस्किटांचा नाश्ता करताना होमगार्ड.

Web Title: The budget session of the Zilla Parishad on 27th May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.