शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
3
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
4
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
5
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
6
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
7
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
8
केजरीवाल जेलमधूनच बघणार लोकसभा निकाल, अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाकडून ५ जूनपर्यंत राखून
9
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
10
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
11
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
12
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
13
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
14
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
15
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
16
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
17
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
18
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
19
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
20
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!

Budget 2021 : भाषणात ४८ वेळा 'टॅक्स' शब्दाचा वापर; पण तरीही 'टॅक्स'पेयर्सच्या हाती निराशाच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 5:30 PM

गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थमंत्र्यांनी केलं १ तासांचं कमी भाषण

ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थमंत्र्यांनी केलं १ तासांचं कमी भाषणअर्थमंत्र्यांकडून कृषी सेस लावण्यात येणार असल्याची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे कामगार वर्गाच्या पदरी थोडी निराशाच पडली. याव्यतिरिक्त पेट्रोल, डिझेल, सोनं, चांदी आणि मद्यासहित अनेक वस्तूंवर सरकारनं कृषी सेस लावण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेलवर लावण्यात आलेल्या सेसचा थेट परिणाम जनतेवर होणार नाही. परंतु अन्य वस्तूंवर लावण्यात आलेल्या सेसमुळे महागाई नक्कीच वाढणार आहे. २०१९ नंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसरा अर्थसंकल्प सादर केला. परंतु यावेळी त्याचं भाषण कमी कालावधीचं होतं. यावेळी त्यांनी १ तास ४८ मिनिटांमध्ये अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांनी २ तास १५ मिनिटं आणि २०२० मध्ये २ तास ४२ मिनिटांमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास एक तास त्यांचं भाषण लहान होतं. आपल्या भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सर्वधिक वेळा 'टॅक्स' या शब्दाचा वापर केला. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान एकूण ४८ वेळा हा शब्द वापरला. तर इन्फ्रास्ट्रक्चर २९ वेळा, परिवहन २८ वेळा, आरोग्य २५ वेळा, अर्थव्यवस्था २१ वेळा आणि कोरोना या शब्दाचा उच्चार १६ वेळा केला. तर रोजगार, डिजिटल आणि तरूण या शब्दांचा त्यांनी सर्वाक कमी वेळा उच्चार केला. यावेळी अर्थसंकल्पाक अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी एक म्हणजे विमा क्षेत्रातीस थेट परकीय गुंतवणूक ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के करण्यात आली. परंतु संचालक मंडळात भारतीय सदस्यच असणार अशीही अट ठेवण्यात आली. याव्यतिरिक्त स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांत सीतारामन यांनी ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एक चांगली बातमी दिली. त्यांना आयकर रिटर्न करण्यापासून सूट देण्यात आली आहे. तसंच त्यांना पेन्शनद्वारे मिळणाऱ्या उत्पनातून कोणताही कर द्यावा लागणार नाही. सध्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. त्यामुळे सामान्य करदात्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनTaxकरParliamentसंसदIndiaभारतHelenहेलन