शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Budget 2020: आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी आज सभागृहात सादर होणार अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 9:03 AM

ज्येष्ठ नागरिक या बजेटच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या पाकीटात आणखी पैसे येईल की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं आहे.

नवी दिल्ली - आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सकाळी 11 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. आज २०१९-२०२० या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल दोन्ही सभागृहात सरकार सादर केला जाईल. हा अहवाल देशाच्या आर्थिक स्थितीविषयी अचूक माहिती सादर करणारा असतो. अर्थ मंत्रालयाने आर्थिक तज्ञांच्या मदतीने हा अहवाल तयार केलेला असतो. 

आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे काय?देशाचा आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून तयार केला जातो. या अहवालात गेल्या 12 महिन्यांत देशाची अर्थव्यवस्था कशी होती, विकास योजना कितपत यशस्वीरित्या राबविल्या गेल्या आणि सरकारच्या सर्व योजनांचा कसा परिणाम झाला याची सविस्तर माहिती दिली जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये विभागले गेले आहे. पहिलं सत्र 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी आणि दुसरं सत्र 2 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान चालेल. आज दुपारी दोन वाजता संसद ग्रंथालयात भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास एनडीएची बैठक होणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात काय असू शकतं? कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) पेन्शन योजना 'ईपीएस' अंतर्गत येणाऱ्या कर्मचार्‍यांना या अर्थसंकल्पात चांगली बातमी मिळू शकेल. योजनेअंतर्गत किमान पेन्शन रकमेची वाढ जाहीर केली जाऊ शकते असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्याच्या ईपीएफ नियमांनुसार, कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जे योगदान दिले आहे त्यातील 8.33% रक्कम पेन्शन योजनेत जाते. म्हणजेच, मालकाच्या एकूण 12% योगदानापैकी केवळ 3.87% पीएफला जातात.

ज्येष्ठ नागरिकांसाठी काय असणार?ज्येष्ठ नागरिक या बजेटच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या पाकीटात आणखी पैसे येईल की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. अधिकाधिक ज्येष्ठ नागरिक त्यांचे बचत आणि उत्पन्नाच्या जोरावर स्वावलंबी पद्धतीने आपले जीवन जगत असतात. निवृत्त लोकांना पेन्शन आणि गुंतवणूक वगळता उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसल्यामुळे ही तफावत बंद व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. प्रत्येकासाठी 5 लाख रुपयांची सूट मर्यादा निश्चित केली पाहिजे जेणेकरुन सर्व ज्येष्ठ नागरिकांवरील कराचा बोजा कमी होऊ शकेल, असा त्यांचं मत आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते, ज्यावर परतावा वर्षाकाठी 8.6.% दराने दिला जातो. सरकार ही मर्यादा वाढविण्यावर, जास्तीत जास्त परतावा देण्याचा विचार करू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2020: बजेटबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? नक्की जाणून घ्या

 

तीन जागतिक घटनांमुळे अर्थमंत्र्यांसमोर उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान

 

Budget 2020 : अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या विविध संज्ञांचा अर्थ

 

ईपीएफ-९५ च्या पेन्शनची रक्कम अर्थसंकल्पात वाढणार?, २५00 ते ५000 रुपयांपर्यंत वाढ होणे शक्य

 

Budget 2020: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम! 

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाbudget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनSenior Citizenज्येष्ठ नागरिकNarendra Modiनरेंद्र मोदीbudget did you knowबजेट माहिती