शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Budget 2020:...तर एलआयसी देशातील सर्वात मोठी कंपनी होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 08:52 IST

एलआयसीच्या कर्मचारी संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करताना देशहिताच्या विरोधातील निर्णय असे म्हटले आहे.

ठळक मुद्देविरोधात 4 फेब्रुवारीला एक तासासाठी देशव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. दुसरीकडे विशेषज्ञ या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. एलआयसीचा आयपीओ या दशकातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. असे झाल्यास एलआयसी देशातील सर्वात मोठी कंपनी बनणार आहे. मात्र, यासाठी केंद्र सरकारला कायद्यामध्ये बदल करावे लागणार आहेत. 

एलआयसीच्या कर्मचारी संघटनांनी सरकारच्या निर्णयाला विरोध करताना देशहिताच्या विरोधातील निर्णय असे म्हटले आहे. याविरोधात 4 फेब्रुवारीला एक तासासाठी देशव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. तर दुसरीकडे विशेषज्ञ या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. एलआयसीचा आयपीओ या दशकातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. यानंतर एलआयसी देशातील सर्वात मोठी कंपनी बनणार असून या कंपनीचे बाजारमुल्य 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. 

आयसीायसीआय डायरेक्टच्या विश्लेशक काजल गांधी यांनी सांगितले की, सरकारी कंपनी असल्याकारणाने एका खासगी कंपनीच्या दृष्टीने मुल्यांकन कमी असू शकते. मात्र, एकदा बाजारात आयपीओ दाखल झाला की मुल्यांकनानुसार एलआयसी देशातील सर्वात मोठी कंपनी बनू शकते. सध्याच्या मालमत्तांच्या आधारे एलआयसी देशाची मोठी कंपनी आहे. यावरून एलआयसीचे मुल्यांकन 8 ते 10 लाख कोटी होऊ शकते. एलआयसीचा आयपीओ म्हणजे सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोला भारतीय बाजारात लिस्ट करण्यासारखे आहे. हा दशकातील सर्वात मोठा आयपीओ असणार आहे, असे एएनएमआयचे अध्यक्ष विजय भूषण यांनी सांगितले.

कायद्यात बदल करावाच लागणार...एलआयसी सध्या इरडाच्या नियंत्रणाखाली येते. मात्र, एलआयसी कायदा 1956 नुसार इरडाने दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त समभाग विकण्यासाठी एलआयसीला परवानगी नाही. एलआयसी कायद्याच्या सेक्शन 37 नुसार एलआयसी पॉलिसी धारकाच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकारने सर्व पॉलिसींना बोनससह ठराविक रक्कम द्यावी लागते. यामुळे या कायद्यानुसार एलआयसी आणखी समभाग विकू शकत नाही. हा कायदा बदलावा लागणार आहे.

Budget 2020 :

 आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाहीसरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणानितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणारमोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

टॅग्स :LIC - Life Insurance Corporationएलआयसीbudget 2020बजेटbudget did you knowबजेट माहितीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनshare marketशेअर बाजारEconomyअर्थव्यवस्था