शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: '...तरीही यांना लाज वाटत नाही'; बजेटनंतर मोदी सरकारवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 18:06 IST

अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली: मोदी सरकार-२ चा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सादर केला. टॅक्स स्लॅबमध्ये बदल, एलआयसी, आयडीबीआय यांच्यातला हिस्सा विकण्याच्या घोषणा यांचा अर्थसंकल्पात समावेश आहे. एकीकडे भाजपाकडून या अर्थसंकल्पाचं कौतुक होत असताना दुसरीकडे विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.  'सरकार देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गाची जबाबदारी पूर्णपणे झटकू पाहतंय. यांना जराही शरम वाटत नाही,' अशा शब्दांत मेवाणी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर बरसले. यावेळी त्यांनी खासगीकरणाच्या मुद्द्यावरुनही सरकारवर जोरदार टीका केली. 'रेल्वे, एअर इंडिया, एलआयसीचं खासगीकरण झालं आहे. खासगीकरणासह कर कपात आणि इतर सवलती देऊन सरकार केवळ अदानी, अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतींसाठी काम करत आहे,' अशी टीका त्यांनी केली.  मोदी सरकार केवळ उद्योगपतींच्या संपत्ती निर्मितीत रस असून सामान्यांशी त्यांना देणंघेणं नाही, असं टीकास्त्र मेवाणी यांनी सोडलं. 'शेतकऱ्यांचे मृत्यू, बेरोजगारी असे प्रश्न आ वासून उभे असताना मोदी सरकार खासगी कंपन्यांच्या हाती अधिकाधिक नियंत्रण देऊ पाहात आहे. कोट्यधीश आणखी श्रीमंत कसे होतील, याची सरकारला चिंता आहे. सार्वजनिक उपक्रमांवरील खर्चाला मात्र सरकारकडून कात्री लावण्यात येत आहे,' अशा शब्दांत मेवाणी यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर तोंडसुख घेतलं.

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीJignesh Mevaniजिग्नेश मेवानी