शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: अर्थसंकल्पाचे संकेत; २०२४ मध्येही मोदीच असतील भाजपचे महानायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:43 IST

योजनांच्या पूर्ततेच्या तारखा निवडणूक वर्षाच्या तोंडावर

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : अर्थसंकल्पावर विरोधी पक्षही कितीही टीका करीत असले तरी भाजपच्या नजरेतून तो निवडणुकांचा आशावाद आणि राजकीय शक्यतांनी भरलेला आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे केंद्रीय नायक बनण्याच्या दिशेने हा अर्थसंकल्प पूर्णपणे तयार दिसतो आहे. मग त्या रेल्वेशी संबंधित योजना असोत की शेतकऱ्यांशी नाही तर रस्त्यांशी. या बहुतेक सगळ्या योजना संपण्याचे वर्ष आहे २०२३ किंवा २०२४.

सार्वत्रिक निवडणुका होतील २०२४ मध्ये. या पार्श्वभूमीवर भाजप या योजनांना पूर्ण करून त्या वर्षात त्यांचा राजकीय लाभ घेण्याची व्यूहरचना करू शकतो आणि या योजनांचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच त्या वेळीही भाजपचे केंद्रीय नायक असू शकतील. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील प्रकल्प बुलेट ट्रेनला पुन्हा एकदा अर्थसंकल्प कालावधीत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला आहे. रेल्वे बोर्डचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनीही म्हटले की, आम्ही वेळेच्या आत तो पूर्ण करू.

बुलेट ट्रेन पूर्णत्वाची नियोजित तारीख ही २०२३ आहे. यासोबत अर्थसंकल्पातदिल्ली-मुंबईदरम्यान नव्या महामार्गालाही २०२३-२०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सीमेवरील रस्त्यांचे जाळेही पूर्ण करण्याचे वर्ष २०२४ ठेवण्यात आले आहे. अर्थसंकल्पात शेतकºयांना शेतीसाठी ब्लू इकॉनॉमीद्वारे गाव-खेड्यांत रोजगार आणि उत्पन्नाची साधने वाढवणे, ‘समुद्र मित्र बनवा’सारख्या योजनांनाही येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.

पुन्हा एकदा मोदी मॅजिक...

दिल्ली - मुंबई आणि दिल्ली - कोलकाता रेल्वे मार्गांवरील रेल्वेंचा येत्या पाच वर्षांत वेग वाढवून, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरला पूर्णपणे सुरू करून दिल्लीहून महाराष्ट्र आणि दक्षिण भारत तथा दिल्लीहून बिहार-पश्चिम बंगालसह संपूर्ण ईशान्य-पूर्व भारतात लोकांना मागणीनुसार रेल्वे प्रवास करण्याचे मोठे लक्ष्यही अर्थसंकल्पात ठेवले गेले आहे. जर या सगळ्या योजना पाच वर्षांत पूर्ण झाल्या तर पुढील निवडणुकीत रोजगार, व्यवसाय, ग्रामीण अर्थव्यवस्थेसह अनेक आघाड्यांवर भाजपच्या हाती निवडणुकीत अशी श्वेतपत्रिका असेल जिच्या आधारे भाजप पुन्हा एकदा मोदी मॅजिकला वापरण्याचा प्रयत्न करू शकतो.

टॅग्स :budget 2020बजेटNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाElectionनिवडणूकIndiaभारतdelhiदिल्लीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र