शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: 'पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 03:42 IST

तेलंगणसारख्या एखाद्या राज्याच्या बरोबरीनेसुद्धा मदत देण्याची केंद्र्र सरकारची भूमिका दिसली नाही.

- प्रल्हाद इंगोलेतेलंगणसारख्या एखाद्या राज्याच्या बरोबरीनेसुद्धा मदत देण्याची केंद्र्र सरकारची भूमिका दिसली नाही. सरसकट कर्जमुक्ती, भावानंतर योजना, सिंचन योजना, पीक विमा, कर्जपुरवठा, कृषी क्षेत्रातील संशोधन, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठेतील चढउतार, सेंद्र्रिय शेतमालापासून तयार झालेल्या उत्पादनाला बाजारपेठ आदी विषयाला साधा स्पर्शसुद्धा या अर्थसंकल्पात झालेला दिसला नाही.शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प शेतकºयांसाठी अत्यंत निराशादायक होता. पाच एकरपर्यंत जमीन असणाºया शेतकºयांना सहा हजार रुपये थेट मदत आणि तीही तीन टप्प्यांत सरकारची ही घोषणा म्हणजे शेतकºयांच्या बाबतीत राज्यकर्त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. खरीप, रब्बी व उन्हाळी यापैकी केवळ खरीप हंगामात शंभर टक्के पेरणी होते. रब्बी हंगामात काही प्रमाणात तर उन्हाळी हंगामात फारच कमी पेरणी असते, असे असताना सरकारची हंगामनिहाय दोन हजार रुपयांची मदत किती अनाकलनीय आहे हे स्पष्ट होते. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने काही आघाड्यांवर चांगले काम केल्याचे दावे जरी कोणी करत असले, तरी शेतकºयांच्या बाबतीत मात्र या सरकारला सपशेल अपयश आल्याचे कोणालाही नाकारता येणार नाही.नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीत शेतकºयांनी केंद्र सरकारला दाखवून दिले की, नाराज शेतकरी काय करू शकतो. त्यातूनही मोदी सरकारने काही बोध घेतल्याचे दिसत नाही. एखादी लोकप्रिय घोषणा केली, म्हणजे शेतकरी त्याला बळी पडतील असाच समज केंद्र सरकारचा झाल्याचे दिसत आहे. शेतकºयांना सरकारच्या तोकड्या मदतीची गरज नसून, शेतकरी उत्पादित करत असलेल्या मालाला हमीभावाची त्याच्या संरक्षणाची सरकारकडून अपेक्षा आहे. के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्यात रयतू बंधू या योजनेच्या माध्यमातून थेट शेतकºयांना पैसे दिल्याने, पुन्हा त्यांचे स्पष्ट बहुमत आल्याचा समज केंद्र सरकारला झाला व त्याची कॉपी करण्याच्या नादात पाच एकरपर्यंतच्या शेतकºयांना प्रत्येकी सहा हजार रुपयांची थेट मदत देण्याची योजना जाहीर केली, पण केंद्राच्या या योजनेचे निकष चुकल्याने याचा सरकारला व शेतकºयाला काहीही फायदा होणार नाही असेच दिसते. तेलंगणामध्ये ‘रयतू बंधू’ या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी प्रति एकर आठ हजार रुपयांची थेट मदत शेतकºयांना दिली जाते. खरीप व रब्बी हंगामात पेरणीच्या वेळेस प्रति एकर चार-चार हजार अशी मदत मिळाल्याने ते पैसे शेतकºयांच्या कामी येत आहेत. एकीकडे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असताना, सरकारच्या दोन हजार रुपयांमध्ये शेतकºयांना कोणती मदत होईल, हे राज्यकर्त्यांनीच तपासून पाहावे.काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्याने शेतकºयांना कर्जमुक्त करून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार काही रचनात्मक (कर्जपुरवठा-कृषी उत्पादन-कृषी प्रक्रिया-दराची हमी- बाजारपेठ) अशी ठोस योजना आणतील, असे वाटले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र असे काहीही झाले नाही. यामुळे शेतकºयांचा फार मोठा भ्रमनिरास झाला असून, सरकार शेतकºयांच्या बाबतीत किती संवेदनाहीन झाले आहे, याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. शेतकºयांच्या डोळ्यांत धूळफेक करत, २२ पिकांना एमएसपी जाहीर करून दीडपट हमीभाव (अ2+ऋछ) देत असल्याचे सांगण्यात आले, पण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार, उ2+50% नफा = हमीभाव सरकारने दिला नाही. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल, तर सरकारने उ3+50% सूत्र स्वीकारले असते. मात्र, मोदी सरकारने देशातील शेतकºयांची पुन्हा एकदा घोर निराशा केली. शेतकºयांना मदत होईल, अशी एकही योजना या अर्थसंकल्पात नव्हती. महागाई कमी झाल्याचा दिंडोरा सरकार पिटत आहे, परंतु या महागाई कमी राखण्यात शेतकºयांचा बळी गेला त्याचे काय? यातून शेतकºयांना सावरण्यासाठी सरकारने कर्जमाफी केली नाही, उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव दिला नाही.(लेखक महाराष्ट्र राज्य ऊसदर नियंत्रण मंडळाचे  सदस्य आहेत)

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019agricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाFarmerशेतकरी