Budget 2019: मोदीss मोदीss घोषणा ऐकून मोदी हसू लागले अन् विरोधक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 15:58 IST2019-02-01T15:56:48+5:302019-02-01T15:58:17+5:30
Budget 2019: केंद्र सरकारकडून यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Budget 2019: मोदीss मोदीss घोषणा ऐकून मोदी हसू लागले अन् विरोधक...
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने मध्यमवर्गींयांना खुश करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. गोयल यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन होत असताना, सभागृहातील खासदारांकडून मोदींची जयघोष सुरू होता. विशेष म्हणजे खासदारांच्या मुखातून होणारा आपला जयघोष पाहून मोदींनाही हसू आवरले नाही. त्यावेळी राहुल गांधी शांत चित्तेनं हा जल्लोष पाहत होते. तर विरोधी पक्षातील खासदारही शांत बसल्याचे पाहायला मिळाले.
केंद्र सरकारकडून यंदाचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. 5 लाख रुपयांपर्यंत कर मर्यादेत सूट, शेतकऱ्यांना मासिक अनुदान आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना पेन्शन या योजना म्हणजे मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जात आहे. सभागृहात अर्थसंकल्प सादर होत असताना, शेतकरी आणि कामगारांसंदर्भातील योजना गोयल यांनी वाचून दाखवल्या. त्यावेळी सभागृहातील खासदारांनी एकच गोंधळ केला. सभागृहात चक्क मोदीssss मोदीssss अशा घोषणा खासदारांनी दिल्या. त्यावेळी मोदींनाही हसू आवरले नाही. तर, विरोधकांकडे पाहून मुद्दामूनच या घोषणा भाजप खासदारांकडून देण्यात येत होत्या. मोदींकडूनही गोयल यांना हसून दाद देण्यात येत होती.