शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Budget 2019: अर्थसंकल्प की निवडणूक जाहीरनामा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 05:30 IST

एफआरबीएम कायदा पूर्णत: वाऱ्यावर; मतचाचण्यांच्या निष्कर्षांना गृहीत धरून सवलतींची बरसात

- सोपान पांढरीपांडे नागपूर : अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प कमी आणि निवडणूक जाहीरनामा जास्त अशा स्वरूपाचा आहे. यात गोयल यांनी मध्यमवर्गीय, पगारदार, कामगार, शेतकरी महिला, व्यापारी व उद्योजक अशा सर्व घटकांना सवलती दिल्या आहेत. जनमत सर्वेक्षणात भाजपाप्रणीत रालोआचे केवळ २५२ खासदार निवडून येतील हे भाकीत घेऊन ही सवलतींची बरसात आहे.मध्यमवर्गीयांसाठी ६.५० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले त्याचा फायदा दोन कोटी प्राप्तिकरदात्यांना आणि किसान सन्मान योजनेचा लाभ १२ कोटी शेतकºयांना होईल. या १५ कोटी कुटुंबांच्या मतांसाठी सरकारने २२,७०० कोटी महसुलावर पाणी सोडले आहे.या अर्थसंकल्पात किसान सन्मान योजनेचा बोजा या वर्षी (२०१८-१९) २०,००० कोटी व पुढच्या वर्षी ७५,००० कोटी असेल. याशिवाय ईशान्य राज्यातील पायाभूत सोयींसाठीचे ५८,००० कोटी अशा १.५३ लाख कोटींचा नवा बोजा सरकारवर पडेल. एकूण अर्थसंकल्पीय खर्च व महसूल २७.८४ लाख कोटींचा आहे. सरकारचा महसूल ३.२७ लाख कोटीने वाढला असताना नवीन बोजा ५० टक्के आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय तूट २०१८-१९ व २०१९-२० या दोन्ही वर्षांसाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.४० टक्के व महसुली तूट २.२० टक्के राहणार आहे.अर्थसंकल्पात नवीन रोजगार कुठून येणार याबाबत ठोस भाष्य नाही. पायाभूत सुविधा क्षेत्राचा विकास होताना नवीन रोजगार संधी निर्माण होतात, पण त्या तात्पुरत्या असतात. त्यामुळे स्थायी रोजगार म्हणजे नियमित उत्पन्न देणाºया नोकºया कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यावर अर्थसंकल्पात काहीही उल्लेख नाही.अर्थव्यवस्थेला बसू शकतो फटकावाजपेयी सरकारने २००३ साली ठरवल्याप्रमाणे फिस्कल रिस्पॉन्सिबिलीटी अ‍ॅण्ड बजेट मॅनेजमेंट (एफआरबीएम) कायद्यानुसार अर्थसंकल्पीय तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के व महसुली तूट १.५० टक्का असायला हवी. लोकानुनयी अर्थसंकल्प देण्याच्या नादात याकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष केले असून, याचा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो.

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस