शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019: अब की बार, घटला मध्यमवर्गीयांचा करभार; प्रसन्न होणार का नोकरदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:09 IST

पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त प्राप्तिकर टप्पे आणि दर कायम

नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या अडीच लाख रुपयांची असलेली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवून पाच लाख रुपये केली आहे. प्रमाणित वजावट (स्टॅँडर्ड डिडक्शन) ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये केली आहे. या निर्णयाचे लोकसभेतील सदस्यांनी मेज वाजवून स्वागत केले. प्राप्तिकराचे अन्य टप्पे आणि दर त्यांनी कायम ठेवले आहेत.प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा अर्थमंत्री गोयल यांनी अडीच लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांवर नेली आहे. याशिवाय आयकरचे टप्पे आणि दर यामध्ये त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. जेव्हा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल, त्या वेळी पाच लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना काही दिलासा दिला जाऊ शकेल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करतानाच गोयल यांनी प्रमाणित वजावट ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये केली आहे. यामुळे सर्वच उत्पन्न गटातील करदात्यांना दिलासा मिळणार आहे. आधीपासून प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० (सी) खाली असलेली दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला करामधून सूट मिळण्याची तरतूद कायम राखली आहे.टीडीएसच्या रकमेत बदलबॅँका, तसेच पोस्ट आॅफिसेसमधील ठेवींवरील व्याजावरील करकपातीची मर्यादा १० हजार रुपयांवरून ४० हजार रुपयांवर नेत असल्याची घोषणा केली आहे.या निर्णयामुळे बॅँका, तसेच पोस्टामधील ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार असून, बॅँकांना १५ जी/एच फॉर्म भरून घेण्याचा त्रासही कमी होणार आहे. सध्या बॅँकांमधील ठेवींवरील व्याज वर्षाला १० हजार रुपयांपेक्षा अधिक झाल्यास त्यावर उद्गमी करकपात केली जात होती.ज्या ठेवीदारांचे उत्पन्न करपात्र नाही, अशांना दरवर्षी बॅँकेला १५ जी/एच हा फॉर्म भरून द्यावा लागत होता. आत ही मर्यादा ४० हजार रुपयांवर नेली गेल्यामुळे ठेवींचे प्रमाण वाढून बॅँकांना दिलासा मिळण्याची मोठी शक्यता आहे.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019piyush goyalपीयुष गोयलTaxकर