शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

Budget 2019: १ लाख कोटी रुपये खर्चून सवलतींचा ५५ कोटी लोकांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 06:06 IST

शहरी मतदाराला जवळ करण्याचा प्रयत्न

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : अंतरिम अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लखलखीत मुद्रा उमटली आहे. अंतरिम असूनही तो संपूर्ण अर्थसंकल्पाच्या स्वरूपात सादर करण्याचे धाडस या आधी कोणत्याही सरकारने केले नव्हते, ते मोदींनी केले. भाजपापासून दूर गेलेल्या शहरी मतदाराला जवळ आणण्यासाठी प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढविण्याची पंतप्रधानाची सूचना पीयूष गोयल यांनी तंतोतंत पाळली.त्यामुळे तिजोरीवर १८,५०० कोटी व अन्य सवलतींमुळे आणखी ४,७०० कोटी रुपयांचा भार पडेल. मात्र, या निर्णयाद्वारे मोदींनी विरोधकांना चीतपट केले. या सवलतींमुळे तीन कोटी करदाते भाजपावर खूश आहेत. विविध सवलतींसाठी मोदी सरकार १ लाख कोटी रुपये खर्च करणार असून, त्याचा लाभ ५५ कोटी लोकांना होईल.पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या आधी दरवर्षाला १० हजार रुपये देण्याचा विचार होता. मात्र, १ लाख कोटी रुपयांत हा खेळ करण्यासाठी शेतकºयांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यामुळे १२ कोटी शेतकºयांच्या खात्यांत ७५ हजार कोटी रुपयांचे अनुदान जमा होईल. असंघटित क्षेत्रासाठी लागू होणाºया पेन्शन योजनेचा लाभ ४० कोटी कामगारांना मिळेल. त्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च होतील. या योजनेत कामगाराला दरमहा ५५ रुपये जमा करावे लागतील व तेवढीच रक्कम केंद्र सरकारही देईल, पण त्यासाठी सरकारने २,२०० कोटी रुपयांची तरतूद केलेली नाही.जिंकली अनेकांची मनेदुष्काळ व अन्य संकटांनी त्रस्त शेतकरी, मध्यमवर्ग व असंघटित कामगारांना खूश करण्यावर मोदींचा भर आहे. शेतकºयाला मदतीचा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मार्चआधीच जमा होईल. प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविल्याचा फायदा ३ ते ६ कोटी लोकांना होईल. मात्र, अंतरिम भरघोस सवलती देऊन मोदींनी निवडणुकांआधीच अनेकांची मने जिंकली आहेत.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019piyush goyalपीयुष गोयलNarendra Modiनरेंद्र मोदी