शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

भाजपावाल्यांना पळवून पळवून मारू, बसपा नेत्याची घसरली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 11:19 IST

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीनं हातमिळवणी केल्यानंतर दोन्ही पार्टीतील कार्यकर्ते प्रचंड उत्साहात दिसत आहेत. सपा-बसपा कार्यकर्त्यांचा उत्साह मंगळवारी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या जन्मदिवशीदेखील पाहायला मिळाला. पण उत्साहाच्या भरात कार्यकर्ते काहीही बरळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करताना बसपा नेत्याची जीभ घसरलीभाजपावाल्यांना पळवून पळवून मारणार - विजय यादवपंतप्रधान मोदींनी गरीबांसाठी काहीच केले नाही - विजय यादव

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीनं हातमिळवणी केल्यानंतर दोन्ही पार्टीतील कार्यकर्ते प्रचंड उत्साहात दिसत आहेत. सपा-बसपा कार्यकर्त्यांचा उत्साह मंगळवारी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या जन्मदिवशीदेखील पाहायला मिळाला. पण उत्साहाच्या भरात कार्यकर्ते काहीही बरळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुरादाबादमध्ये बसपा अध्यक्ष मायावती यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी 'जय भीम'च्या घोषणा देत भाजपा आणि काँग्रेसविरोधात जोरदार नारेबाजी केली. यावेळेस, बसपा नेते विजय यादव यांनी व्यासपीठावरुन उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसवर तिखट शब्दांत हल्लाबोल केला, तर भाजपाला धमकीवजा इशाराही दिला. यावेळेस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधताना यादव यांची जीभ घसरली.

'भाजपावाल्यांना पळवून पळवून मारणार', असे विधान विजय यादव यांनी केले. पुढे काँग्रेसला टार्गेट करत ते म्हणाले की, ''काँग्रेस पार्टीनं चार गांधी दिले...इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. भाजपानं काय दिलं, नीरव मोदी, ललित मोदी आणि अंबानीच्या मांडीवर बसलेले नरेंद्र मोदी.''

ते इथेच थांबले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना यादव म्हणाले की, 'नरेंद्र मोदी यांनी केवळ उद्योगपतींसाठीच काम केले आहे. गरीबांसाठी काहीच केले नाही. आगामी काळात निवडणुका होणार आहेत. अजून लढाई बाकी आहे. त्यामुळे घाबरू नका. या भारतीय जनता पार्टीवाल्यांना पळवून पळवून मारणार. ' यानंतर भाजपावर टीका करताना यादव यांच्या भाषेची पातळी अधिकच घसरल्याचे दिसले. 

'आता यांना (भाजपाला) आपली मेलेली आजी आठवेल. कारण सपा-बसपा एकत्र झाले आहेत. सपा-बसपाला एकाच व्यासपीठावर पाहून सर्वजण बेशुद्ध होतील', असं यादव म्हणालेत.

यादव यांनी आपल्या भाषणाचा शेवट, 'जय भीम जय भारत. जय बहन मायावती और जय अखिलेश भैया. बाकी सबका निकल गया तेल, भैया अब चलेगा सपा-बसपा का खेल', असे वाक्य म्हणून केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहmayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी