राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राखण्यात बसपा अपयश?
By Admin | Updated: February 11, 2015 01:59 IST2015-02-11T01:59:59+5:302015-02-11T01:59:59+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची किंमत बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावून मोजावी लागणार

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राखण्यात बसपा अपयश?
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची किंमत बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावून मोजावी लागणार आहे़ राष्ट्रीय पक्षाचा दर्जा वाचविण्यासाठी बसपाने दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उतरविले होते़ या ठिकाणी दोन जागा आणि सहा टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य बसपापुढे होते़ हे लक्ष्य गाठण्यात बसपा अपयशी ठरली़ दिल्लीत बसपाला केवळ १़४ टक्के मते मिळाली़