राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राखण्यात बसपा अपयशी?
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:25+5:302015-02-11T00:33:25+5:30
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची किंमत बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावून मोजावी लागणार आहे़ आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा वाचविण्यासाठी बसपाने दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उतरविले होते़ याठिकाणी दोन जागा आणि सहा टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य बसपापुढे होते़ मात्र हे लक्ष्य गाठण्यात बसपा अपयशी ठरली आहे़

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राखण्यात बसपा अपयशी?
न ी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची किंमत बहुजन समाज पार्टी अर्थात बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावून मोजावी लागणार आहे़ आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा वाचविण्यासाठी बसपाने दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उतरविले होते़ याठिकाणी दोन जागा आणि सहा टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य बसपापुढे होते़ मात्र हे लक्ष्य गाठण्यात बसपा अपयशी ठरली आहे़लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत जागा आणि मतांच्या टक्केवारीचे लक्ष्य गाठता न आल्याने बसपापुढे दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने एक संधी होती़ मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पक्षाची कामगिरी या कसोटीवर कमी पडली़ दिल्लीत बसपाला केवळ १़४ टक्के मते मिळाली़अनेक मतदारसंघात बसपा उमेदवारांना १००० पेक्षाही कमी मते मिळाली़ तथापि काही उमेदवारांनी चांगली मते घेतली़ दोन जागा आणि सहा टक्के मते मिळविण्याचे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरल्यानंतर बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा संपुष्टात आणण्यासंदर्भात नोटीस जारी करण्याची तयारी निवडणूक आयोगाने चालवली आहे़ बसपाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येईपर्यंत पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाबाबतचा निर्णय स्थगित ठेवण्याची विनंती आयोगाकडे केली होती़बॉक्ससन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर निवडणूक आयोगाने बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला कारणे दाखवा नोटीस जारी करून आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा का संपुष्टात येऊ नये, अशी विचारणा केली होती़बॉक्स लोकसभा निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये दोन टक्के मते(११ जागा) जिंकणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते़ तसेच लोकसभेच्या किमान चार जागा आणि कमीत कमी चार राज्यांत विधानसभा निवडणुकीत पडलेल्या वैध मतांपैकी सहा टक्के मते मिळविणारा पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यास पात्र ठरतो़