शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू - मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 09:38 IST

राहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपा आणि काँग्रेस दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

ठळक मुद्देराहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा फॉर्म्युला हिट ठरल्यानंतर काँग्रेसने गरिबांना साद घातली. 'काँग्रेस पक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक जिंकल्यास सत्ता स्थापनेनंतर लगेचच देशातील प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी दिली जाईल', असे आश्वासन राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधील जाहीर सभेत दिलं आहे. मात्र राहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपा आणि काँग्रेस दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

मायावती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी घोषणा केलेल्या किमान उत्पन्नाच्या हमीची ‘गरिबी हटाव’ घोषणेशी तुलना केली आहे. राहुल गांधींनी दिलेले हे आश्वासन इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये दिलेल्या ‘गरिबी हटाव’ घोषणेप्रमाणेच हे एक आश्वासन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींनी अशी आश्वासनं देण्याआधी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करावी असंही मायावती यांनी म्हटलं आहे. 

मायावतींचा 'व्हॉट्सअ‍ॅप नंबर' सोशल मीडियात व्हायरल

राहुल गांधींनी दिलेले हे आश्वासन ‘गरिबी हटाव’ प्रमाणेच आहे. भाजपा सरकारने काळ्या पैशाविरोधात आश्वासन दिले होते. त्यांनी देशातील प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आणि अच्छे दिनचे आश्वासन दिले होते. मात्र भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :mayawatiमायावतीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा