बीएसएनएल देणार ३६ रुपयांत एक जीबी डाटा
By Admin | Updated: February 7, 2017 02:08 IST2017-02-07T02:08:12+5:302017-02-07T02:08:12+5:30
सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ३६ रुपये प्रति जीबी या दराने ३ जी डाटा देणारी नवी आॅफर आणली आहे.

बीएसएनएल देणार ३६ रुपयांत एक जीबी डाटा
नवी दिल्ली : सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ३६ रुपये प्रति जीबी या दराने ३ जी डाटा देणारी नवी आॅफर आणली आहे.
कंपनीने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्पेशल टॅरिफ व्हाऊचर्स (एसटीव्ही) या विशेष आॅफरवर चारपट अधिक डाटा देण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे.