गुजरातच्या भुजमध्ये सीमेवर पाकिस्तानची बोट सापडल्याने खळबळ; BSF कडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:53 IST2022-05-04T19:52:36+5:302022-05-04T19:53:30+5:30
बीएसएफने सांगितले की, इंजिन नसलेली बोट जप्त केली आहे. ही बोट पाकिस्तानमध्ये बनवली आहे. जप्त करण्यात आलेल्या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही.

गुजरातच्या भुजमध्ये सीमेवर पाकिस्तानची बोट सापडल्याने खळबळ; BSF कडून तपास सुरू
नवी दिल्ली. भारतीय सीमा सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. गुजरातमधील भुजमध्ये भारतीय हद्दीत घुसलेले पाकिस्तानी जहाज ताब्यात घेतले आहे. संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे गुजरात बीएसएफने म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानी बोट भारतीय हद्दीत सुमारे 100 मीटर आत दिसली, त्यानंतर ती जप्त करण्यात आली, असे बीएसएफचे म्हणणे आहे. दरम्यान, आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आली आहे. ही एक पारंपारिक बोट आहे, जी मासेमारीसाठी वापरली जाते. बोट इंजिनशिवाय आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, बीएसएफ भुजचे पथक अरबी समुद्राजवळ गस्त घालत होते. त्यावेळी बीपी क्रमांक 1158 हरामी नाला परिसरात काही संशयास्पद गोष्टी घडण्याची शक्यता होती. त्यानंतर पाकिस्तानी मच्छीमार तीन-चार बोटीतून भारतीय पाण्यातून खोलवर येत असल्याचे दिसले. यानंतर बीएसएफ पथक जात असताना पाकिस्तानी मच्छिमार परिसरातील झुडपांच्या मदतीने लपून पाकिस्तानच्या हद्दीत पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर बीएसएफच्या पथकाने एक बोट ताब्यात घेतली.
Pakistani fishermen saw BSF patrols coming towards them & took advantage of the marshy area & fled into Pakistani territory. BSF patrol chased them & seized 01 engineless country made Pakistani fishing boat in Indian territory near BP No. 1158: BSF Gujarat (2/3) pic.twitter.com/dfVqxrNgCp
— ANI (@ANI) May 4, 2022
संपूर्ण परिसरात शोधमोहीम
बीएसएफने सांगितले की, इंजिन नसलेली बोट जप्त केली आहे. ही बोट पाकिस्तानमध्ये बनवली आहे. जप्त करण्यात आलेल्या बोटीची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. बोटीत फक्त मासे, जाळी आणि इतर काही मासेमारीचे साहित्य दिसत होते. मात्र बीएसएफच्या पथकाने या संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली. यानंतरही काही मिळाले मिळाले नाही. पाकिस्तानी मच्छिमार आधीच पळून गेले होते.