शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मानवी तस्करी रोखण्यासाठी बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर सतर्कता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 02:57 IST

कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.

दिल्ली/कोलकाता : सुमारे ४,०९६ किलोमीटर लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सतर्कता वाढवली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मानवी तस्करी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे हा खबरदारीचा उपाय केला जात आहे.बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.बीएसएफने १९ ते २९ जून या दोन आठवड्यांच्या कालावधीत पाच बांगलादेशी नागरिकांना रेल्वे डब्यांमधून पकडले होते. ते पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात आले होते. त्यांचे वय १२ ते २५ वर्षे होते. लॉकडाऊनमुळे रोजगार गेल्यानंतर या लोकांना आमिष देऊन सीमापार तस्करीच्या माध्यमातून आणले गेले, असे समजले जात आहे. यामुळे बीएसएफने आपल्या सर्व सीमा चौक्यांवर सतर्कता वाढवली आहे.दिल्लीत बीएसएफच्या एका अधिकाºयाने सांगितले की, या मुद्यावर आम्ही आमचे समकक्ष बीजीबी (बॉर्डर गार्ड बांगलादेश) यांच्याशी समन्वय साधून आहोत. सीमेवर असे प्रकार घडता कामा नयेत, हे पाहणे आमचे काम आहे. याबरोबरच पकडलेल्या गुन्हेगारांची योग्य पद्धतीने चौकशीही केली जात आहे. बीएसएफ व बीजीबीचे सध्या चांगले संबंध आहेत. काही ठिकाणी संयुक्त गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सीमा रक्षक दल आपापल्या गुप्तचरांच्या माहितीची देवाण-घेवाण करीत आहे.दक्षिण बंगालला लागून असलेली ९१३ किलोमीटरची सीमा अधिक संवेदनशील समजली जाते. या सीमेवर बहुतांश गुन्हे घडतात. यात मानवी तस्करी, पाळीव प्राण्यांची तस्करी, अंमलीपदार्थांची तस्करी, कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यापासून अनेक ठिकाणी माणसांना बेकायदेशीररीत्या भारतातपाठवण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.प्राण्यांच्या तस्करीसाठी नवनवीन पद्धतीमान्सूनचा काळ व नद्यांना आलेले अफाट पाणी याद्वारेही भारतातून बांगलादेशात पाळीव प्राण्यांची तस्करी केली जाते.पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात असा प्रकार प्रथमच उघडकीस आला. एका सांगाड्यात लपवून जिवंत बछड्याची तस्करी केली जात असताना पकडले होते.केळीच्या खांबांचा तराफा बनवून त्याला बांधून प्राण्यांची तस्करी केली जाते. असे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले आहेत.नदीतून होणारी तस्करी टाळण्यासाठी सीमा सुरक्षा दल बोटद्वारेगस्त घालत आहे.तसेच सीमेवर मोठमोठे खड्डे खोदले जातआहेत.सीमेवरील गुन्हे रोखण्यासाठी गस्त घालणाºया जवानांची गुन्हेगारांशी चकमक होऊन जानेवारी २०१८ ते जून २०२० या कालावधीत २०० पेक्षा अधिक जवान जखमी झालेले आहेत.

 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतBangladeshबांगलादेश