बीएसएफमध्ये सेवेत असलेल्या जवानाच्या पत्नीवर तिच्याच दोन दिरांनी वारंवार बलात्कार केल्याची एवढंच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ तयार करून तिला ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या सासरच्या मंडळींसह एकूण ७ जणांविरोधात गुन्दा दाखल करण्यात आला असून, एका आरोपी दिराला अटक करण्यात आली आहे.
याबाबत तक्रार देणाऱ्या पीडित महिलेने सांगितले की, लग्नानंतर मी मझ्या सासूसह गावाबाहेर वेगळ्या घरात राहते. माझे पती बीएसएफमध्ये आहेत. त्यामुळे ते नेहमीच कर्तव्यावर असतात. जेव्हा माझी सासू तिथून गावातील घरी जायची तेव्हा माझे दोन दीर घरात घुसायचे. तसेच माझ्यावर बलात्कार करायचे. त्यांनी बलात्कार करतानाचे व्हिडीओसुद्धा चित्रित केले होते.
या व्हिडीओंचा वापर करून ते मला ब्लॅकमेल करायचे. एवढंच नाही तर जेव्हा माझे पती सुट्टी घेऊन गावी आले, तेव्हा त्यांनी त्यांनाही हे व्हिडीओ दाखवले. तसेच त्यांना मारहाणदेखील केली. आरोपींनी माझीही हत्या करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही पीडितेने केला आहे/
दरम्यान, या प्रकरणी जहानाबाद पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार मिश्रा यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून सासूसासऱ्यांसह एकूण ७ जणांविरोधात गिन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील एक आरोपी असलेला दीर हरिओम याला अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.