बीएसएफ जवानाची दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळ्या घालून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 11:38 PM2017-09-27T23:38:07+5:302017-09-28T07:56:06+5:30

बंदीपो-यातील हाजीनमध्ये एक जवानाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. बीएसएफचा जवान रमीझ अहमद परे हे सुट्टी संपवून परतले असता दहशतवाद्यांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला आहे.

BSF jawans attacked and shot dead the terrorists | बीएसएफ जवानाची दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळ्या घालून केली हत्या

बीएसएफ जवानाची दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळ्या घालून केली हत्या

googlenewsNext

जम्मू-काश्मीर - बंदीपो-यातील हाजीनमध्ये एक जवानाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. बीएसएफचा जवान रमीझ अहमद पारे हे सुट्टी संपवून परतले असता दहशतवाद्यांनी घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील माणसेही जखमी झाली आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, रमीझ अहमद पारे  यांचं घर हाजीनमधील पारे मोहल्ल्यात असून दहशतवाद्यांनी नियोजनद्धपणे रमीझ यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात रमीझ यांचा जागीच मृत्यू झाला तर रमीझ यांचे वडील, भाऊ आणि चुलती या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आहेत. या तिघांपैकी रमीझ यांच्या चुलतीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.



दरम्यान, रमीझ राजस्थानात बीएसएफमध्ये सेवा बजावत होते आणि सध्या ते सुट्टीवर आले होते.


म्यानमारच्या सीमेवर भारतीय जवानांची धडक कारवाई
भारतीय जवान म्यानमार सीमेवर गस्त घालत होते. त्यावेळी नागा बंडखोरांनी गोळीबार केला. जवानांनी गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. त्यानंतर जोरदार कारवाई करून बंडखोरांचे तळच उद्ध्वस्त केले. कारवाईनंतर काही दहशतवादी पळून गेले आहेत. या कारवाईत एकही भारतीय जवान जखमी झाला नाही आणि भारतीय जवानांनी म्यानमारची सीमा ओलांडली नाही, हा सर्जिकल स्ट्राइक नव्हता, लष्करी कारवाई होती हेही स्पष्ट करण्यात आले.

सीमेवर दहशतवादी तळ
या कारवाईमध्ये अनेक नागा दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची संख्या उघड झाली नाही. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग गट) चे दहशतवाद्यांचे भारत व म्यानमारच्या सीमेवरील गावांत काही तळ आहेत. ते दहशतवादी तेथून भारतीय जवानांवर हल्ले करीत असतात.

‘आॅपरेशन अर्जुन’द्वारे भारताने शिकवला पाकला धडा
भारतीय नागरी वस्त्यांवर आणि चौक्यांवर हल्ले करणा-या पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) राबविलेल्या ‘आॅपरेशन अर्जुन’मुळे पाकचे कंबरडे मोडले. सीमेवर पाकच्या लष्करी अधिका-यांच्या घरांना लक्ष्य करून झालेल्या या आॅपरेशनमध्ये पाकचे आठ सैनिक तसेच माजी सैनिक व अधिका-यांसह ११ नागरिक ठार झाले.

Web Title: BSF jawans attacked and shot dead the terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.