शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएफमधील जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 07:59 IST

मृत मुलाच्या हातात पिस्तुल सापडल्यानं गूढ वाढलं; पोलिसांकडून तपास सुरू

रेवाडी: लष्कराच्या जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट आरोप केल्यानं चर्चेत आलेले बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी हे आत्महत्येचं प्रकरण असल्याची माहिती दिली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेले जवान तेज बहादूर यादव यांचा 22 वर्षीय मुलगा रोहितचा मृतदेह काल रेवाडीतील शांती विहार कॉलनीमधील राहत्या घरी आढळून आला. दिल्ली विद्यापीठात शिकणारा रोहित त्याच्या घरी आला होता. रोहितचे वडील तेज बहादूर कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला गेले आहेत. रोहितची आई गुरुवारी संध्याकाळी कार्यालयातून घरी परतली. त्यावेळी रोहितची खोली बंद होती. अनेकदा प्रयत्न करुनही दरवाजा न उघडल्यानं त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

रोहितनं आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी त्याची खोली आतून बंद होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 'खोली उघडल्यावर रोहित पलंगावर मृत अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या हातात एक पिस्तुलदेखील होतं. त्याचे वडील कुंभमेळ्याला गेले आहेत. त्यांना आम्ही या घटनेची माहिती दिली आहे,' असं पोलिसांनी सांगितलं. रोहितच्या हातात सापडलेलं पिस्तुल परवानाप्राप्त होतं की नाही, याबद्दलचा तपास सध्या पोलीस करत आहेत. बीएसएफमधये असताना तेज बहादूर यादव यांनी जवानांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित करणारा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला. यावरुन मोठा वादही निर्माण झाला. याची दखल पंतप्रधान कार्यालयानं घेतली होती. यानंतर शिस्तभंगाप्रकरणी कारवाई करत बीएसएफनं यादव यांना निलंबित केलं. मूळचे हैदराबादचे रहिवासी असलेले तेज बहादूर यादव त्यांच्या कुटुंबासह रेवाडीत राहतात. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलSuicideआत्महत्या