BSFने तयार केली खास लॅब; सीमेपलीकडून येणार्‍या ड्रोनवर कशी ठेवणार नजर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 06:44 PM2022-11-17T18:44:55+5:302022-11-17T18:51:05+5:30

भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन घुसखोरीच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याने बीएसएफने खास लॅब उभारली आहे.

BSF has set up a special labs to monitor drones coming from across the border  | BSFने तयार केली खास लॅब; सीमेपलीकडून येणार्‍या ड्रोनवर कशी ठेवणार नजर? जाणून घ्या

BSFने तयार केली खास लॅब; सीमेपलीकडून येणार्‍या ड्रोनवर कशी ठेवणार नजर? जाणून घ्या

googlenewsNext

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन घुसखोरीच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्यानंतर देशात पहिल्यांदाच गृह मंत्रालय आणि तज्ज्ञ एजन्सीने खास लॅब विकसित केली आहे. या लॅबमध्ये घुसखोर ड्रोनची दोन प्रकारे तपासणी केली जाणार आहे. यामध्ये सीमेवर दिसणारे आणि दुसरे म्हणजे मारले गेलेले ड्रोन, अशी तपासणी केली जाईल.  बीएसएफचा ही खास लॅब मागील काही महिन्यांत सुरक्षा दलांनी विकसित केली आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या ड्रोनवर ते लक्ष ठेवणार आहे. 

ड्रोन यूएव्ही सायबर फॉरेन्सिक लॅब विकसित करणार्‍या एजन्सींना विश्वास आहे की, ही लॅब भारतावर पसरलेल्या सध्याच्या ड्रोन धोक्याचा सामना करण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध होईल. या लॅबमध्ये असे खास तंत्र असणार आहे, ज्याद्वारे ड्रोनमध्ये बसवलेले जीपीएस ओळखता येईल. ड्रोनमध्ये असलेल्या जीपीएसच्या मदतीने सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना हे ड्रोन कुठून पाठवले गेले आणि कुठे गेले याची माहिती मिळू शकणार आहे. 

BSFने तयार केली खास लॅब
याशिवाय या लॅबमध्ये असलेल्या विशेष तंत्रज्ञानामुळे शत्रूने पाठवलेल्या ड्रोनचे लोकेशन पाहता येईल. तसेच ते ड्रोन किती काळ हवेत होते याचा कालावधी देखील कळणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे या लॅबमध्ये जप्त केलेल्या ड्रोनच्या हार्डवेअरसह पाकिस्तानी डेटाही हॅक केला जाऊ शकतो. बीएसएफचे डीजी पंकज सिंह यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाच्या सहकार्याने अशी लॅब सध्याच्या काळाची गरज आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन ही लॅब तयार करण्यात आली आहे. पाकिस्तान भारतात ड्रग्ज तस्करी करण्यासाठी नेव्हिगेट टू होम ड्रोनचा वापर करत आहे.

सीमेवर ड्रोन पाहण्याच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ 
दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन पाडण्याच्या आणि ड्रोन पाहण्याच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. यावरून पाकिस्तानच्या कुरघोडींचा अंदाज लावला जाऊ शकतो. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये तब्बल १०९ वेळा ड्रोन भारतीय सीमेवर घिरट्या घालताना दिसले होते. तर यावर्षी आतापर्यंत ही संख्या २२४ च्या पुढे गेली आहे. त्यामुळे आता या लॅबच्या मदतीने ड्रोनची यंत्रणा कोणत्या देशातून चालवली जाते, हार्डवेअर कुठे आहे, याची माहिती मिळणार आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: BSF has set up a special labs to monitor drones coming from across the border 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.