बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 21:36 IST2025-01-12T21:35:05+5:302025-01-12T21:36:22+5:30

भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. सैनिकांनी २४ हून अधिक बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मागे ढकलले आहे.

BSF alert, major infiltration plot foiled; More than 24 Bangladeshis expelled | बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

बीएसएफ अलर्ट, घुसखोरीचा मोठा कट उधळला; २४ हून अधिक बांगलादेशींना हाकलले

बांगलादेशात काही दिवसापूर्वी शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेले. नवीन  मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले, तेव्हापासून भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचे प्रयत्न सतत सुरू आहेत. दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना मोठे यश मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या दक्षिण बंगाल फ्रंटियरच्या विविध बटालियनच्या सतर्क सैनिकांनी बंगालच्या उत्तर २४ परगणा आणि नादिया जिल्ह्यांमधील भारत-बांगलादेश सीमेवर वेगवेगळ्या कारवाईत बेकायदेशीर घुसखोरीचे मोठे प्रयत्न उधळून लावले आणि एकूण २४ बांगलादेशी आणि दोन रोहिंग्यांना अटक केली.

'नेहरू अपघाताने पंतप्रधान झाले; सरदार पटेल, डॉ. आंबेडकर पात्र होते'- मनोहर लाल खट्टर

या प्रकरणाबाबत बीएसएफने रविवारी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, हे सर्व घुसखोर वेगवेगळ्या सीमावर्ती भागातून बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. याशिवाय, जवानांनी सीमेवर तस्करीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आणि बंदी घातलेल्या फेन्सेडिल कफ सिरपच्या ५६५ बाटल्या आणि तीन किलो गांजा, तसेच २,९०० क्विनाइन सल्फेट गोळ्या, ७०० इंजेक्शन आणि १,२०० आर्टिमेथर इंजेक्शनची मोठी खेप जप्त केली. याशिवाय ११ गुरेही तस्करीपासून वाचविण्यात आली.

बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी जवानांनी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून २० बांगलादेशी आणि दोन रोहिंग्या आणि नादिया सीमेवरून चार बांगलादेशींना बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना पकडले आणि परत हाकलून लावले. घुसखोर घरकाम आणि मजुरीच्या कामासाठी मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादला जात होते. बांगलादेशकडून घुसखोरीचे सतत प्रयत्न होत आहेत, पण सतर्क सैनिक त्यांचे मनसुबे हाणून पाडत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली

इतर घटनांमध्ये, मालदा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या ११९ व्या बटालियनच्या महदीपूर, गोपालनगर, सबदलपूर आणि नवादा या सीमा चौक्यांच्या सैन्याने त्यांच्या संबंधित जबाबदारीच्या क्षेत्रातून वेगवेगळ्या कारवाईत ५६५ बाटल्या फेन्सेडिल जप्त केल्या, असे अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय, ८८ व्या बटालियनच्या पन्नापूर सीमा चौकीच्या सैनिकांनी आठ गुरे वाचवली आणि ११५ व्या बटालियनच्या सैनिकांनी तीन गुरे तस्करीपासून वाचवली.

Web Title: BSF alert, major infiltration plot foiled; More than 24 Bangladeshis expelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.