शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

D आऊट अन् I इन; मुख्यमंत्री होण्याआधी येडियुरप्पांनी बदललं नावाचं स्पेलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 17:02 IST

सरकार टिकवण्यासाठी घेतला ज्योतिषांचा सल्ला

बंगळुरू - भाजपाचे कर्नाटकमधील ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, नव्याने सरकार स्थापन करण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी एक मोठा बदल केला आहे. येडियुरप्पांनी आपल्या नावात बदल केला असून,  येडियुरप्पांनी राज्यपालांना जे पत्र दिले आहे त्यामध्ये त्यांनी आपल्या नावातून D हे अक्षर हटवून I या अक्षराचा समावेश केला आहे. बी. एस. येडियुरप्पा हे आतापर्यंत आपले नाव इंग्रजीमध्ये B.S. Yeddyurappa असे लिहायचे. मात्र आज त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करताना दिलेल्या पत्रात आपले नाव B.S. Yediyurappa असे लिहिले आहे. दरम्यान, येडियुरप्पा यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यानं नावात बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.खरंतर आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला येडियुरप्पा हे आपले नाव B.S. Yediyurappa असे लिहायचे. अगदी 1975 मध्ये लढवलेल्या पहिल्या निवडणुकीपासून ते 2007 मध्ये सात दिवसांचा मुख्यमंत्री बनण्यापर्यंत येडियुरप्पांनी हेच नाव कायम ठेवले होते. मात्र अंकज्योतिषांनी दिलेल्या सल्ल्यानुसार कर्नाटचे मुख्यमंत्रिपद भूषवत असताना त्यांनी आपल्या नावात थोडासा बदल करून B.S. Yeddyurappa असे नाव धारण केले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा आपल्या जुन्या नावावर परतले आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये कुमारस्वामी पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन  सरकार स्थापनेचा दावा केला आहे.  आता आज संध्याकाळी येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारण