कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यपदी बी.एस. येडीयुरप्पा यांची नियुक्ती
By Admin | Updated: April 8, 2016 16:43 IST2016-04-08T16:43:58+5:302016-04-08T16:43:58+5:30
भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यातील भाजपच्या प्रमुख पदांवर बदल केले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी नियुक्ती कर्नाटक

कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यपदी बी.एस. येडीयुरप्पा यांची नियुक्ती
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यातील भाजपच्या प्रमुख पदांवर बदल केले आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी नियुक्ती कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती केली आहे. तर, उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यपदी केशव प्रसाद मौर्य यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर पंजाब, तेलंगना आणि अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी बदल करण्यात आले आहेत. पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी विजय सांपला, तेलंगनाच्या डॉ. को. लक्ष्मण आणि अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी तापिर गाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा सध्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी असून त्यांच्या जागी प्रल्हाद व्ही जोशी यांची वर्णी लागली आहे.