शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात स्वबळावर सरकार आणू; प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढणार - अजय कुमार लल्लू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 09:34 IST

पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या देखरेखीखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाईल आणि राज्यात तीन दशकांपासून सत्तेपासून दूर राहिलेला काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत येईल” असे ते म्हणाले.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढवू एवढी क्षमता आमच्याकडे आहे, असे उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी म्हटले. काहीच दिवसांपूर्वी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने या निवडणुकीत महत्वाच्या आघाड्या करण्याची शक्यता नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर लल्लू म्हणाले, “ समाजवादी पक्ष किंवा बहुजन समाज पक्षासोबत युती वा आघाडी न करता आम्ही निवडणूक लढवू व स्वबळावर सरकार स्थापन करू.”पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या देखरेखीखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाईल आणि राज्यात तीन दशकांपासून सत्तेपासून दूर राहिलेला काँग्रेस पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत येईल” असे ते म्हणाले. वृत्तसंस्थेला रविवारी दिलेल्या मुलाखतीत लल्लू म्हणाले, दडपशाही करणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारला मुख्य आव्हान म्हणून काँग्रेस समोर आला आहे आणि ४०३ सदस्यांच्या विधानसभेत समाजवादी पक्षाच्या ४९ आमदारांच्या तुलनेत फक्त पाच आमदार असलेला काँग्रेस पक्ष अधिक परिणामकारक विरोधी पक्ष म्हणून सिद्ध झाला आहे. 

राज्यात बदलाचे वारे वाहत आहेत- राज्यात बदलाचे वारे वाहत आहेत. ‘बदलाव की आंधी है, जिसका नाम प्रियांका गांधी है’, असे सांगून लल्लू म्हणाले की, प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना ही वेगवेगळ्या पातळ्यांवर बळकट झाली आहे. - आगामी निवडणूकीत प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले जाईल का असे विचारता अजय कुमार लल्लू म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते घेतील. - या निवडणुकीत प्रियांका गांधी या पक्षाचा चेहरा असतील का, असे विचारल्यावर लल्लू म्हणाले, प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशच्या प्रभारी असून निवडणूक त्यांच्या देखरेखीखाली लढवली जाईल. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशVidhan Parishadविधान परिषद