थोडक्यात बातम्या

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

दुष्काळी जिल्हा जाहीर करा

Briefly news | थोडक्यात बातम्या

थोडक्यात बातम्या

ष्काळी जिल्हा जाहीर करा
अहमदनगर: गेल्या दोन वर्षापासून दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ खरीप हंगाम वाया गेला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ जनावरांना चारा उपलब्ध नाही़ त्यामुळे नगर जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़
़़़़
प्रभाग आरक्षणासाठी सोडत
अहमदनगर: जिल्ह्यातील अकोले, कर्जत आणि पारनेर नगरपंचायतींच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, प्रभागनिहाय आरक्षण सोडत येत्या २० ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे़ आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रांत अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात येणार आहे़
़़़़़़
बसच्या फेर्‍या वाढविण्याची मागणी
अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली बससेवा सुरू आहे़ मात्र बसच्या फेर्‍या अत्यंत कमी आहेत़ त्यामुळे कामगारांची गैरसोय होत आहे़ बसच्या फेर्‍या वाढविल्यास कामगारांचीही सोय होईल, अशी मागणी उद्योजकांच्या वतीने सोमवारी करण्यात आली आहे़
़़़़़
वाहतूक शाखेची कारवाई
अहमदनगर: जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त येणारे नियोजन भवनसमोर दुचाकी उभी करून कार्यालयात जातात़ कार्यालयातून बाहेर येईपर्यंत त्यांची दुचाकी गायब असते़ त्याचा फटका बैठकीसाठी येणार्‍या चाकरमान्यांनाही बसत असून, वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे संताप व्यक्त होत आहे़

Web Title: Briefly news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.